पंकज काईंगडे यांना पुरस्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पंकज काईंगडे यांना पुरस्कार
पंकज काईंगडे यांना पुरस्कार

पंकज काईंगडे यांना पुरस्कार

sakal_logo
By

82078
....

डॉ. पंकज काईंगडे यांना पुरस्कार
कोल्हापूर, ता. ११ ः रिप्रोडक्टिव्ह मेडिसीन क्षेत्रात उत्कृष्ट संशोधन केलेल्या कार्याबद्दल येथील डॉ. पंकज काईंगडे यांना इंडियन सोसायटी ऑफ असिस्टेड रिप्रॉडक्शन संस्थेचा डॉ. गौतम खास्तगीर सर्वोत्कृष्ट संशोधक-भ्रूणशास्त्रज्ञ संशोधन पुरस्कार प्रदान केला. तमिळनाडूचे शिक्षणमंत्री के. पोनमुडी, डॉ. मनीष बँकर, अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धन यांच्या हस्ते भोपाळ येथे पुरस्कार प्रदान सोहळा झाला.
यावेळी ‘इसार’च्या अध्यक्ष डॉ. नंदिता पालशेतकर, डॉ. ऋषिकेश पै, डॉ. शांता कुमारी व डॉ. सुजाता कर उपस्थित होते. डॉ. काईंगडे हे रेप्रोहेलिक्स लॅबसचे संस्थापक व संचालक आहेत. या पुरस्कारासाठी त्यांना डॉ. सचिन कुलकर्णी, डॉ. गोरख मंद्रुपकर, डॉ. डी. स्वामीनाथन, डॉ. अमर निकम यांचे मार्गदर्शन लाभले. सध्याची बदलती जीवनशैली, मानसिक ताणतणाव यांसह अनेक कारणांमुळे स्त्री-पुरुष जननक्षमतेवर प्रतिकूल परिणाम होत चालला आहे. याबाबतचे महत्त्वपूर्ण संशोधन भ्रूणशास्त्रज्ञ डॉ. पंकज काईंगडे यांनी केले.