
Gag121_txt.txt
82187
सोशल मीडियावर गगनबावड्यात कार्यशाळा
गगनबावडा ः ‘सोशल मीडिया वरदान आहे. पण सोशल मीडियाचे फायदे आहेत; तसे तोटेही आहेत. सोशल मीडिया माणसाच्या जगण्याची पद्धत बदलत आहे,’ असे प्रा. सुरेश पाटील यांनी सांगितले. पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव महाविद्यालयात सोशल मीडिया उच्च शिक्षणातील ज्ञानभांडार विषयावर शिवाजी विद्यापीठाच्या अग्रणी महाविद्यालय योजनेंतर्गत एकदिवसीय कार्यशाळा झाली. प्रमुख वक्ते वैभववाडीचे रावराणे महाविद्यालय, इतिहास विभागप्रमुख, एस. एन. पाटील यांनी ‘सोशल मीडिया संकल्पनेची उत्पत्ती, प्रकार आणि इतिहास’ तसेच, सद्यःस्थितीबाबत मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी सचिव व प्र-प्राचार्या डॉ. विद्या देसाई होत्या. प्रमुख पाहुणे संस्थाध्यक्ष प्रा. सतीश देसाई व प्रमुख उपस्थिती नॅक समन्वयक प्रा. डॉ. एस. एस. पानारी होते. चौगले महाविद्यालय, कोतोलीचे प्रा. डी. एच. नाईक यांनी ‘सोशल मीडियाचा उच्च शिक्षणातील वापर’वर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांचे मनोगत व प्रमाणपत्र वितरणानंतर कार्यशाळेचा समारोप झाला. प्रास्ताविक व आयोजन प्रा. आदिनाथ कांबळे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. व्ही. एस. पाटील यांनी, तर प्रा. एच. एस. फरास यांनी आभार मानले.