जागृतीच्या विद्यार्थ्यांनी केली काळभैरी डोंगराची स्वच्छता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जागृतीच्या विद्यार्थ्यांनी केली 
काळभैरी डोंगराची स्वच्छता
जागृतीच्या विद्यार्थ्यांनी केली काळभैरी डोंगराची स्वच्छता

जागृतीच्या विद्यार्थ्यांनी केली काळभैरी डोंगराची स्वच्छता

sakal_logo
By

82202
काळभैरी डोंगर : जागृती हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी काळभैरी डोंगरावर स्वच्छता मोहिम राबविली.

जागृतीच्या विद्यार्थ्यांनी केली
काळभैरी डोंगराची स्वच्छता
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १२ : येथील जागृती हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी काळभैरी डोंगरावर स्वच्छता मोहिम राबविली. या मोहिमेत शाळेच्या १५८ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. सहा तास मोहिम राबवत सारा परिसर चकाचक करण्यात आला.
येथील ग्रामदैवत काळभैरवाची नुकतीच यात्रा झाली आहे. यात्रा काळात काळभैरी डोंगरावर मोठ्या प्रमाणात कचरा झाला होता. भाविकांकडून पत्रावळी, प्लास्टीक ग्लास, वाट्या, रिकामी बॉटल्स फेकून दिले होते. त्यामुळे डोंगर परिसरात अस्वच्छता झाली होती. जागृती हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी डोंगर परिसरात स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. काळभैरी डोंगर कमानीपासून ते हडलगे गावाकडे जाणाऱ्या रस्त्यापर्यंत स्वच्छता करण्यात आली.
क्रीडा शिक्षक संपत सावंत यांनी स्वच्छता मोहिमेचे नियोजन केले. पुजारी सुरेश गुरव यांनी सहकार्य केले. संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. सतीश घाळी, उपाध्यक्ष अरविंद कित्तूरकर, सचिव अॅड. बाबुराव भोसकी, सहसचिव गजेंद्र बंदी, मुख्याध्यापक विजय चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहिम राबविण्यात आली. प्रवीण पाटील, प्रकाश गायकवाड, सविता कमनुरी आदी उपस्थित होते.