शिष्यवृत्ती परीक्षेची ‘वेळ साधली’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिष्यवृत्ती परीक्षेची ‘वेळ साधली’
शिष्यवृत्ती परीक्षेची ‘वेळ साधली’

शिष्यवृत्ती परीक्षेची ‘वेळ साधली’

sakal_logo
By

GAD1212.JPG
82370
गडहिंग्लज : शिष्यवृत्ती परीक्षा संपल्यानंतर विद्यार्थ्यांसह पालकही टेन्शन फ्री झाल्याने त्यांच्या चेहऱ्‍यावर आनंद होता. तेव्हा परीक्षा केंद्रावर सेल्फी घेण्याचा मोह आवरला नाही. (आशपाक किल्लेदार : सकाळ छायाचित्रसेवा)
-----------------
शिष्यवृत्ती परीक्षेची ‘वेळ साधली’
गडहिंग्लजला २१४३ विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा; १६ केंद्रावर होती बैठक व्यवस्था
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १२ : गेली दोन वर्षे शिष्यवृत्ती परीक्षेत कोरोनाचे विघ्न आले होते. त्यामुळे वेळापत्रक कोलमडले होते. नियोजित वेळापत्रकाच्या चार ते सहा महिन्यांनी परीक्षा झाल्या होत्या. पण, यंदा शिष्यवृत्तीची वेळ साधण्यात शिक्षण विभागाला यश आले. गडहिंग्लजला २१४३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यामध्ये पाचवीच्या १३७७, तर आठवीच्या ७६६ विद्यार्थ्यांचा समावेश होता. शहरातील चार केंद्रासह १८ केंद्रावर बैठक व्यवस्था केली होती. पाचवी (पूर्व उच्च प्राथमिक) व आठवीसाठी (पूर्व माध्यमिक) दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात परीक्षा घेण्याचा शिरस्ता आहे. पण, दोन वर्षे कोरोनामुळे तो पाळता आला नव्हता. मात्र, यंदा नियोजित वेळेत आज परीक्षा झाली. गडहिंग्लज तालुक्यात पाचवीसाठी १३८६ तर आठवीसाठी ७७१ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती. मात्र, पाचवीचे नऊ तर आठवीचे पाच विद्यार्थी गैरहजर राहिले. उर्वरित विद्यार्थ्यांनी सकाळी अकराला भाषा व गणित तर दुपारी दोनला इंग्रजी व बुद्धीमत्तेचा पेपर सोडवला.
पाचवीसाठी १२ तर आठवीसाठी ६ केंद्रावर बैठक व्यवस्था केली होती. शहरातील जागृती हायस्कूल, वि. दि. शिंदे हायस्कूल, साधना हायस्कूल व गडहिंग्लज हायस्कूलवर केंद्र होते. ग्रामीण भागात कडगाव, कौलगे, दुंडगे, मुत्नाळ, नूल, बसर्गे, हलकर्णी, नरेवाडी, सांबरे, भडगाव, नेसरी (२), महागाव (२) येथे परीक्षा केंद्र होती. सकाळी साडेआठला केंद्रावर प्रश्नपत्रिका पोचवल्या. प्रभारी गटशिक्षणाधिकारी नवलकुमार हलबागोळ, विस्तार अधिकारी आर. आर. कोरवी यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षा प्रमुख चंद्रकांत जोशी, सहायक रवींद्र पाटील, अरुण देशपांडे, आनंदा आजगेकर यांनी नियोजन केले.
-----------------
मधली सुट्टी दीड तासांची
यापूर्वी शिष्यवृत्तीचा पहिला पेपर झाल्यानंतर एक तासाची सुट्टी होती. पण, यंदा त्यामध्ये वाढ करीत ती दीड तास केली होती. वाढवलेली वेळ विद्यार्थ्यांना सोईची ठरली. पाचवीसाठी १४७ तर आठवीसाठी ७१ शिक्षकांनी पर्यवेक्षक म्हणून काम पाहिले. पाचवी व आठवीचे वर्गशिक्षक वगळून माध्यमिक शाळेच्या शिक्षकांना नियुक्ती दिली होती. तर केंद्र संचालकपदाची जबाबदारी अन्य तालुक्यातील शिक्षकांवर सोपविली होती.