पाटील यांच्याकडून काळभैरी चरणी नऊ किलो चांदी अर्पण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाटील यांच्याकडून काळभैरी चरणी नऊ किलो चांदी अर्पण
पाटील यांच्याकडून काळभैरी चरणी नऊ किलो चांदी अर्पण

पाटील यांच्याकडून काळभैरी चरणी नऊ किलो चांदी अर्पण

sakal_logo
By

82277

बड्याचीवाडी : श्री काळभैरव देवासाठी शिवाजी पाटील यांनी प्रांताधिकारी वाघमोडे यांच्याकडे नऊ किलो चांदी सुपूर्द केली. या वेळी दिनेश पारगे, शरद मगर, अरुण बेल्लद आदी उपस्थित होते.
...

काळभैरीचरणी नऊ किलो चांदी अर्पण

गडहिंग्लज, ता. १२ : चंदगड विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे नेते शिवाजी पाटील यांच्याकडून श्री काळभैरव देवाच्या चरणी नऊ किलो चांदी अर्पण केली. श्री काळभैरव डोंगर परिसर तीर्थक्षेत्र म्हणून विकसित होण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करणार असल्याचे पाटील यांनी या वेळी सांगितले.
पाटील यांनी डोंगरावरील श्री काळभैरव मंदिरात प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांच्याकडे ही चांदी सुपूर्द केली. देवाचा गाभारा सुशोभीकरण व मखरासाठी ही चांदी वापरण्यात येणार असल्याची माहिती देवस्थान समितीकडून दिली. यावेळी पाटील म्हणाले, ‘श्री काळभैरव देवस्थान लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. यामुळे मंदिर व डोंगर परिसराचा विकास होणे आवश्यक आहे.’ यावेळी तहसीलदार दिनेश पारगे, गटविकास अधिकारी शरद मगर, मुख्याधिकारी स्वरूप खारगे, भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस रवी बांदिवडेकर, सत्तुप्पा पेडणेकर, अरुण बेल्लद, सुधीर पाटील, पुजारी सुरेश गुरव, निवृत्त पोलिस उपअधीक्षक अंगद जाधवर, भाजपचे तालुकाध्यक्ष नामदेव पाटील आदींसह प्रशासकीय अधिकारी व भाविक उपस्थित होते.