Wed, March 29, 2023

पंचगंगा घाट स्वच्छता
पंचगंगा घाट स्वच्छता
Published on : 12 February 2023, 3:32 am
82313
पंचगंगा नदीकाठावर
मनपाकडून डागडुजी सुरू
कोल्हापूर, ता. १२ ः महापालिकेकडून पंचगंगा नदीकाठावर स्वच्छता, किरकोळ डागडुजी केली जात आहे. कणेरी मठावर होत असलेल्या लोकोत्सवाच्या पूर्वसंध्येला सिद्धगिरी मठाकडून नदीकाठावर महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे. महाआरतीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यासह अनेक मंत्री, आमदार, खासदार उपस्थित राहणार आहेत. महापालिकेच्या आरोग्य व पवडी विभागाने स्वच्छतेचे काम चालवले आहे. आवारातील मंदिरे, मातीचा परिसर, झुडुपे स्वच्छ करण्यात येत असून फरशांचीही डागडुजी केली जात आहे. नदीच्या पायऱ्यादरम्यान काँक्रिटीकरणही केले जात आहे. नवीन लोखंडी ग्रील बसवण्यात येणार आहे.