Fri, March 24, 2023

कोल्हापूर किरकोळ दुकानदार असोसिएशन बैठक
कोल्हापूर किरकोळ दुकानदार असोसिएशन बैठक
Published on : 12 February 2023, 5:56 am
बंदवेळी दुपारी
बारापर्यंतच दुकाने
बंद ठेवण्याचा निर्णय
कोल्हापूर, ता. १२ ः कोल्हापूर किरकोळ दुकानदार असोसिएशनची त्रैमासिक बैठक महाराणी ताराराणी हॉल येथे झाली. बैठकीत भविष्यातील व्यवसाय अडचणी, उपाय व वाटचाल यावर चर्चा झाली. तसेच यापुढे कोणत्याही राजकीय अथवा तत्सम संप, बंदच्या वेळी किराणा दुकाने फक्त दुपारी बारापर्यंतच बंद ठेवून पाठिंबा दर्शवून संपूर्ण दिवस दुकाने बंद करण्यात येणार नाही, असा संघटनेने निर्णय घेतला. यावेळी कार्याध्यक्ष संदीप वीर, अमोल कापसे, उमेश वालावलकर, समीर कुलकर्णी व किरकोळ दुकानदार उपस्थित होते. पुढील दिशा ठरवण्यासाठी दुसरी सभा आयोजित करण्यात येणार असल्याचे बैठकीत सांगितले.