
आमचं शहर आमचं बजेट
फोटो 81589
-
लोगो- आमचं शहर आमचं बजेट (कालच्या टुडे २ वरून)
बहुमजली पार्किंग व्यवस्था सक्षम करा
बाजूपट्ट्यांचे क्रॉक्रीटीकरण, रस्त्याच्या दुतर्फा पांढरे पट्टे, सेंकद बोर्डसह सिग्नल पाहिजेत
कोल्हापूर ः शहरात बहुमजली पार्किंग वाढले पाहिजे. महापालिकेच्या खुल्या जागांचा वापर पार्किंगसाठी झाला पाहिजे. त्यासाठी महापालिकेने बजेटमध्ये याची तरतूद केली पाहिजे. कोल्हापुरातील पार्किंग व्यवस्था योय पद्धतीने झाल्यास शहरातील वाहतूक कोंडी अपोआप कमी होईल. बिंदू चौकातील पार्किंगसाठी फास्टटॅग पद्धतीच्या ‘डिजिटल’ पद्धतीने आकारणी व्हावी. शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी गाडी अड्डायाच पूर्ण वापर झाला पाहिजे, ट्रक टर्मिनल्स झाले पाहिजे. दिशादर्शक फलक, रस्त्याच्या दोन्ही बाजूला कॉंक्रीटीकरण करून पार्किंगसाठी जागा करावी, काही ठिकाणी फेरवाल्यांसाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूला पांढरे पट्टे मारावेत यासाठी बजेटमध्ये तरतूद झाली पाहिजे. सकाळ माध्यम समुहाच्या ‘आमचं शहर आमचं बजेट’ या उपक्रमात..... येथे झालेल्या बैठकीत तज्ज्ञांनी सूचमा मांडल्या. कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे, सदस्य अनिल धडाम, वाहतूक शाखेचे पोलिस कॉन्स्टेबल सचिन जांभळे यांनी ही शहरातील पार्किंग व्यवस्था अधिक सक्षम केली पाहिजे. त्यासाठी बंदीस्त पार्किंग खुले झाले पाहिजे. यासाठीही माहापालिकेने प्रयत्न करण्याची गरज असल्याचे सुचविले.
-------
संजय पाटील, पोलिस उपनिरीक्षक - शहर वाहतूक नियंत्रण शाखा, शहरातील बहुमजली पार्किंग व्यवस्था सक्षम व्हावी. रस्त्याच्या दोन्ही बाजूला काँक्रिटीकरण व्हावे. दुचाकी, चारचाकींचे सम-विषम तारखांसाठी पार्किंग करणे शक्य होईल. पांढरे पट्टे मारल्याने वाहतुकीला शिस्त लागेल.
----
श्रीनिवास मिठारी, धान्य व्यापारी- लक्ष्मीपुरी फोर्ड कॉर्नर, सावित्रीबाई फुले चौकात वीज मंडळाचे डीपी रस्त्यालगत आहेत ते तातडीने हटविण्यासाठी महापालिकेने पावले उचलावीत. खुल्या जागेत पार्किंगची व्यवस्था करावी, लक्ष्मीपुरी येथे रस्त्याच्या दुतर्फा पांढरे पट्टे मारण्यासाठी निधीचे नियोजन करावे.
-------
संजय पाटील, उपाध्यक्ष, चेंबर ऑफ कॉमर्स- राजारामपुरी वाहतूक व्यवस्थेसाठी मॉडेल बनविण्याचा आराखडा यापूर्वी तयार झाला. महापालिकेकडून अपेक्षित निधी न मिळाल्याने तो प्रत्यक्षात अंमलात आला नाही. यासाठी महापालिका, व्यापारी शहर वाहतूक नियंत्रण शाखा यांच्या संयुक्त बैठक आवश्यक आहे. त्यातून उपाय योजनांसाठी महापालिकेने निधीची व्यवस्था करावी. ------------
प्रा. अभय जोशी, वाहतूक अभ्यासक - ‘स्मार्ट सिटी’च्या माध्यमातून नियोजन झाले पाहिजे. खड्डेमुक्त कोल्हापूर करून केएमटीचे बस थांबे रस्त्यापासून काही अंतर आतील बाजूस करावेत. केएमटी वाहतूक अधिक सक्षम झाल्यास खासगी वाहतूक कमी होईल. त्यासाठी महापालिकेने निधीची व्यवस्था करावी.
--------
संपत पाटील, कापड व्यावसायिक -प्रत्येक दुकानाच्या दारात गाडी पोचली तरच व्यवसाय होतो. यासाठी सम-विषम तारखे सोबतच ग्राहकांच्या वाहनांसाठी महापालिकेने नियोजन करावे, यासाठी बंदीस्त पार्किंग खुले करण्यासाठी पुढाकार घ्या. पांढरे पट्टे मारावेत.
---------
सुभाष जाधव, अध्यक्ष लॉरी ऑपरेटर्स असोसिएशन- महापालिकेने ट्रक टर्मिनल्ससाठी निधीची व्यवस्था करावी. शहरात दिवसभर येता येत नाही. त्यावेळी तो ट्रक कोठे उभा करायचा ? यासाठी जागा उपलब्ध नसते. त्यामुळे ते ट्रक रस्त्यावर उभे राहतात.
-----------
सुभाष शेटे, सचिव, कोल्हापूर जिल्हा ॲटो रिक्षा संघर्ष समिती- महापालिकेने अतिक्रमण निर्मूलन विभागासाठी जादा ट्रक घ्यावेत. प्रत्येक वॉर्डात स्वतंत्र ट्रक असवा. त्यामुळे रस्त्यावरील स्टॅण्डी बोर्डसह अन्य अतिक्रमण काढणे सोपे जाईल.
-----
धनंजय दुग्गी, व्यपारी- शहरात प्रत्येक रस्त्याची डावी बाजू वाहतुकीसाठी खुली पाहिजे. यासाठी महापिलेकने कोपऱ्यावर कोण, फ्लेक्सीबल डिव्हायडरची व्यवस्था करावी.
-------
सूचना अशा...
-सरस्वती टॉकीजवळील बहुमजली पार्किंग तातडीने पूर्ण व्हावे
-व्हीनस कॉर्नर गाडी अड्डा येथे पर्यटकांच्या वाहनांसाठी व्यवस्था हवी. तेथे शौचालय आणि स्नानगृहाची व्यवस्थेसाठी महापालिकेने बजेटची तरतूद करावी
-ट्रक टर्मिनल्सची व्यवस्था करावी
-रस्त्यांच्या दुतर्फा पार्किंग व्यवस्था सम-विषम तारखेला करण्यासाठी
तेथील कॉंक्रीटीकरण, पांढरे पट्टे मारणे यासाठी खर्चाची तरतूद कारावी.