कोश्‍यारी यांच्या राजीनाम्यावर ‘शिवभक्त समिती’चा विजयोत्सव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोश्‍यारी यांच्या राजीनाम्यावर ‘शिवभक्त समिती’चा विजयोत्सव
कोश्‍यारी यांच्या राजीनाम्यावर ‘शिवभक्त समिती’चा विजयोत्सव

कोश्‍यारी यांच्या राजीनाम्यावर ‘शिवभक्त समिती’चा विजयोत्सव

sakal_logo
By

फोटो (KOP23L82565)
...............

‘शिवभक्त समिती’चा
विद्यापीठात विजयोत्सव

गुरुवारचा ‘कोल्हापूर बंद’ मागे

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर, ता. १३ ः भगतसिंह कोश्‍यारी यांचा राज्यपालपदाचा राजीनामा मंजूर झाल्याबद्दल कोल्हापुरातील शिवभक्त लोक आंदोलन आणि सर्वपक्षीय समितीकडून शिवाजी विद्यापीठात आज विजयोत्सव साजरा करण्यात आला. या समितीतील सदस्यांनी विद्यापीठातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. कोश्‍यारी यांच्याविरोधात पुकारण्यात आलेला गुरुवार (ता. १६) बंद या समितीने मागे घेतला.
या समितीचे सदस्य सोमवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास विद्यापीठात आले. त्यांनी छत्रपती शिवरायांना अभिवादन केले. ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘कोल्हापूरकरांच्या एकजुटीचा विजय असो’, अशा घोषणा देत त्यांनी कोश्‍यारी यांच्या राजीनामा मंजुरीचा विजयोत्सव साजरा केला. समितीचे निमंत्रक वसंतराव मुळीक म्हणाले, ‘छत्रपती शिवरायांचा वारंवार अवमान करणाऱ्या कोश्‍यारी यांना कोल्हापुरात पाऊल ठेवू द्यायचे नाही, असा निर्धार करत आम्ही सर्व कोल्हापूरकरांतर्फे गुरुवारी बंदची हाक दिली होती. आमच्या भावना लक्षात घेऊन कोश्‍यारी यांचा राजीनामा मंजूर झाला. हा स्वाभिमानी कोल्हापूरच्या जनतेचा विजय आहे. राजीनामा मंजूर झाल्याने आता कोश्‍यारी कोल्हापुरात येणार नाहीत. त्यामुळे आम्ही बंद मागे घेतला आहे.’
शिवाजीराव परूळेकर म्हणाले, ‘राज्यपाल कोश्‍यारी राजकारणातील घटनाक्रमाप्रमाणे गेले. मात्र, त्यांचा काळा इतिहास जनता कधीही विसरणार नाही.’ या विजयोत्सवात आर. के. पोवार, संभाजीराव जगदाळे, बबन रानगे, डी. जे. भास्कर, बाळासाहेब भोसले, जयकुमार शिंदे, अशोक जाधव, चंद्रकांत पाटील, अशोक पोवार, सुभाष देसाई, रंगराव पाटील, प्रकाश पाटील, अभिषेक मिठारी, सुनीता पाटील, शैलजा भोसले, अशोक भंडारी आदी सहभागी झाले.