
प्रा. कुराडे यांच्या दोन ग्रंथांना पुरस्कार
gad135.jpg
82477
कोल्हापूर : दोन ग्रंथांना मिळालेला पुरस्कार प्रा. किसनराव कुराडे यांनी स्वीकारला. यावेळी अरुण पाटील, अरुण शिंदे, रा. तु. भगत, शामराव कुरळे आदी उपस्थित होते.
------------------------------------------------------------------
प्रा. कुराडे यांच्या
दोन ग्रंथांना पुरस्कार
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १३ : शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष व साहित्यिक प्रा. किसनराव कुराडे यांच्या सत्यशोधक महात्मा बसवेश्वर व स्वयंभू यशवंतराव घाटगे संस्थानिक शाहू महाराज झाले नसते तर .... या दोन संशोधन ग्रंथांना करवीर साहित्य सभेच्या वतीने पुरस्कार देऊन गौरवले.
संजय घोडावत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अरुण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात पुरस्कार वितरण झाले. रयत शिक्षण संस्थेचे कार्यकारी संचालक उद्योगपती एम. बी. शेख यांची प्रमुख उपस्थिती होती. संत गाडगेबाबा प्रतिष्ठानचे संस्थापक रा. तू. भगत यांनी प्रास्ताविक केले. पाहुण्यांचा परिचय प्राचार्य दिनकरराव पाटील यांनी करून दिला. वाचन कट्टाचे संस्थापक युवराज कदम, करवीर साहित्य सभेचे कार्याध्यक्ष शामराव कुरळे, प्राचार्य माळी, डॉ. सरोज बिडकर यांच्यासह राज्यातील लेखक उपस्थित होते. करवीर साहित्य सभेचे कोषाध्यक्ष एम. डी. देसाई यांनी आभार मानले.