पानसरे स्मृतीजागर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पानसरे स्मृतीजागर
पानसरे स्मृतीजागर

पानसरे स्मृतीजागर

sakal_logo
By

30999
....

पानसरे स्मृती जागरानिमित्त
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात मोर्चे

जबाब दो आंदोलनः गुरुवारपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १३ ः ज्येष्ठ कामगार नेते, शहीद गोविंद पानसरे यांच्या आठव्या स्मृती दिनानिमित्त गुरुवार (ता. १६) पासून विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. आठ वर्षे होऊनही मारेकरी फरार आहेत. मारेकऱ्यांना तत्काळ पकडून त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी, यासाठी राज्यभरातील सर्व जिल्ह्यांत जबाब दो आंदोलनांतर्गत मोर्चे निघणार आहेत. देशातील विविध भागांतही हे आंदोलन होईल, अशी माहिती मेघा पानसरे, सतीशचंद्र कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कोल्हापुरात गुरूवारी (ता. १६) सकाळी साडेसातला निर्भय वॉक उपक्रम होणार असून, पानसरे यांच्या निवासस्थानापासून वॉकला प्रारंभ होईल. सायंकाळी साडेपाचला कंदलगाव येथे सभा होणार असून वाय. एन. पाटील, बाळासाहेब पाटील, मदन निकम यांचा सहभाग असेल. शुक्रवारी (ता. १७) सायंकाळी साडेपाचला इचलकरंजी येथे होणाऱ्या सभेत महेश सुर्वे, हनुमंत लोहार, ए. बी. पाटील यांचा सहभाग असेल. शनिवारी (ता. १८) गारगोटी येथे सभा होणार असून सम्राट मोरे व सहकारी यांची प्रमुख उपस्थिती असेल. रविवारी (ता.१९) सकाळी साडेदहाला छत्रपती शिवाजी महाराज चौकात, तर सायंकाळी चारला विनयकुमार छात्रालयात ‘शिवाजी कोण होता’ या पुस्तिकांचे वाटप होणार आहे. सोमवारी (ता. २०) सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले जाणार आहे. दसरा चौकातून कार्यकर्ते निवेदन देण्यासाठी जातील, असेही त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला दिलीप पवार, बाबूराव कदम, भरत लाटकर, प्रा. सुभाष जाधव, अनिल लवेकर, रघुनाथ कांबळे, दिलदार मुजावर, सम्राट मोरे, रमेश वडणगेकर आदी उपस्थित होते.
...

सोमवारी होणार जाहीर सभा

सोमवारी (ता. २०) सायंकाळी पाच वाजता संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात जाहीर सभा होणार आहे. मॅगसेसे पुरस्कार विजेते, ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांचे मुख्य भाषण होणार आहे. श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते भालचंद्र कानगो, राज्य सचिव सुभाष लांडे, उदय नारकर यांची प्रमुख उपस्थिती असेल.