इचल : पोलीस वृत्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इचल : पोलीस वृत्त
इचल : पोलीस वृत्त

इचल : पोलीस वृत्त

sakal_logo
By

शाळेच्या दाखल्यात फेरफार,
आळतेच्या एकावर गुन्हा

ःप्रांताधिकारी खरात यांची माहिती

इचलकरंजी, ता. १३ ः शाळेच्या दाखल्यात फेरफार करीत परस्पर दुसऱ्या जातीची नोंद केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत प्रांताधिकारी कार्यालयाकडून हातकणंगले पोलिसांत तक्रार देण्यात आली आहे. तर संबंधिताचा जातीचे प्रमाणपत्र मिळण्याबाबत केलेला अर्ज फेटाळण्यात आल्याची माहिती प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांनी दिली.
येथील प्रांत कार्यालय अंतर्गत हातकणंगले, शिरोळ व इचलकरंजी तहसीलदार कार्यालयाकडून जातीचे दाखले दिले जातात. यामध्ये नंदकुमार गजानन चिंगळे (रा. आळते) यांनी आपल्या मुलगीसाठी मागास प्रवर्ग वाणी जातीचा दाखला काढताना वडील गजानन महादेव चिंगळे यांचा शाळा सोडलेला दाखला सादर केला होता. त्यामध्ये हिंदू लिंगायत ‘वाणी’ असे नमूद केले आहे.
शाळा सोडलेल्या दाखल्यातील जातीबाबत आळते येथील केंद्रीय प्राथमिक शाळेकडे खात्री करण्यात आली. यामध्ये शाळेच्या दप्तरी गजानन महादेव चिंगळे यांच्या नावासमोर धर्म व जात या रकान्यात हिंदू ‘लिंगायत’ अशी नोंद असल्याचे नमूद केले आहे. त्यानुसार ‘वाणी’ जातीची नोंद परस्पर केल्याचे सकृतदर्शनी दिसून आले आहे. त्यामुळे अर्जदार नंदकुमार चिंगळे यांनी ‘वाणी’ जातीचे प्रमाणपत्र मिळण्याबाबत केलेला अर्ज फेटाळण्यात आला असून, त्यांच्या विरोधात हातकणंगले पोलिसांत गुन्हा नोंद केला असल्याचे प्रांताधिकारी खरात यांनी सांगितले.