
युवा राजनितिज्ञ पुरस्कार राजूबाबा आवळे यांना
फोटो : 82544
कोल्हापूर : शाहू स्मारक भवन येथे जीवन कला मंडळातर्फे आमदार राजूबाबा आवळे यांना युवा राजनीतीज्ञ पुरस्कार प्रदान करताना डॉ. लक्ष्मीकांत पारनेरकर. शेजारी अन्य मान्यवर.
...
आमदार राजूबाबा आवळे यांना
युवा राजनीतीज्ञ पुरस्कार प्रदान
कोल्हापूर, ता. १३ : जीवन कला मंडळ, पूर्णवाद युवा फोरम, पूर्णवाद पॉलिटिकल सायन्स ॲकॅडमीतर्फे आमदार राजूबाबा आवळे यांना माजी आमदार (कै.) नामदेवराव व्हटकर स्मृती युवा राजनीतीज्ञ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शाल, श्रीफळ, ११ हजार रुपये रोख, मानपत्र, स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप होते. शिवराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. लक्ष्मीकांत पारनेरकर यांच्या हस्ते आमदार आवळे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. शाहू स्मारक भवनात पुरस्कार वितरण कार्यक्रम झाला.
सारिका लोंढे यांनी मानपत्राचे वाचन केले. तत्पूर्वी, मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. छत्रपती शिवराय, माजी आमदार (कै.) नामदेवराव व्हटकर, डॉ. रामचंद्र महाराज पारनेरकर, डॉ. विष्णू महाराज पारनेरकर यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. यावेळी हिंदकेसरी दीनानाथ सिंह, जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाचे सचिव अशोक पोवार, हेमंत तुपे, महेश व्हटकर यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार झाला.
आमदार आवळे म्हणाले, ‘हा पुरस्कार मला दिल्याबद्दल मी जीवन कला मंडळाचे आभार मानतो. हातकणंगले तालुक्यातील लोकांनी मला आमदार म्हणून संधी दिली. सर्वांना बरोबर घेऊन विकासकामे करण्याचा प्रयत्न सुरू आहे. लोकांनी संधी दिली आहे. त्यामुळे लोकांपर्यंत पोहोचून त्यांची जी काही कामे आहेत, ते करण्याचा प्रयत्न केला जात आहे. जीवन कला मंडळाच्या मंदिराचे काम माझ्या मतदारसंघात करण्यात येणार आहेत. यासाठी लागणारी सर्व मदत देण्यात येईल.’
ऋग्वेद गुळवणी यांनी वेदमंत्रांचे उच्चारण केले. वेदा सोनुले यांनी गीत गायन केले. डॉ. शाम लोंढे यांनी प्रास्ताविक केले. प्रशांत आडे यांनी सूत्रसंचालन केले. जीवन कला मंडळाचे अध्यक्ष विलासराव कुलकर्णी, मंडळाचे उपाध्यक्ष सर्जेराव माने, कार्याध्यक्ष मकरंद दीक्षित, संतोष पवार-देसाई, संजय जोशी, सरस्वती जाधव आदींनी नियोजन केले. यावेळी आशिष थोरात, निखिल शिंदे व अन्य मान्यवर उपस्थित होते.