पंचमहाभुत महोत्सव तयारी बातमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पंचमहाभुत महोत्सव तयारी बातमी
पंचमहाभुत महोत्सव तयारी बातमी

पंचमहाभुत महोत्सव तयारी बातमी

sakal_logo
By

फोटो
...

पर्यावरणीय जाणिवा जागृत करणारा महोत्सव

दालनांच्या निर्मितीमध्ये माती, लाकूड, जुन्या कपड्यांचा वापर

ओंकार धर्माधिकारी : सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर, ता. १४ ः कणेरी येथील सिद्धगिरी मठावर होणाऱ्या सुमंगल महोत्सवाची तयारी युद्धपातळीवर सुरू असून, ती अंतिम टप्प्यात आली आहे. पंचमहाभुतांचे महत्त्व विशद करणाऱ्या या महोत्सवातील दालनांची उभारणी करताना सर्व वस्तू पर्यावरणपूरक वापरण्यात आल्या आहेत. माती, लाकूड, गवत, जुन्या साड्या यांचा वापर सजावटीसाठी करण्यात आला आहे. त्यामुळे हा महोत्सव खऱ्या अर्थाने पर्यावरणीय जाणिवा जागृत करणारा ठरेल.
सृष्टी ही पंचमहाभुतांपासून बनली असून, पर्यावरण संतुलनासाठी पंचमहाभुतांची संकल्पना समजावून घेणे आवश्यक आहे. याच दृष्ट्रिकोनातून सुमंगल महोत्सव होणार आहे. या ठिकाणी प्रत्येक तत्त्वाचे एक स्वतंत्र दालन आहे. या दालनामध्ये प्रत्येक तत्त्वाचे महत्त्व, त्याचा पर्यावरणाशी असणारा संबंध आणि त्याच्या संवर्धनासाठी केले जाणारे उपाय यांची माहिती, या दालनांमध्ये आहे. ही दालने उभारताना पर्यावरणपूरक साधनांचा वापर केला आहे. दालन सजवण्यासाठी जुन्या साड्या, कपडे यांचा कौशल्याने वापर केला आहे. दालनातील मूर्ती बनवण्यासाठी गवत आणि माती यांचा वापर झाला आहे. दालनाची कमान ही लाकडी पुठ्ठा रंगवून बनवली आहे. हे सर्व रंगवण्यासाठी पाण्यात विरघळणारे रंग उपयोगात आणले आहेत. ज्या ठिकाणी शक्य आहे तेथे जुन्या वस्तू वापरून सजावट केली आहे. दालनातील प्रदर्शन हे अत्यंत अर्थपूर्ण बनवले असून, याचीही निर्मिती पर्यावरणपूरक साधनांमधून केली आहे. त्यामुळे हा महोत्सव खऱ्या अर्थाने पर्यावरणपूरक होणार आहे.
-------------------

करपात्रातून भोजन

सध्या सुमंगल महोत्सवाची तयारी करण्यासाठी शेकडो स्वयंसेवक तयारीसाठी राबत आहेत. त्यांच्या जेवणाची व्यवस्थाही तेथेच करण्यात आली आहे. एवढ्या लोकांना प्लास्टिकचे ताट, वाटी किंवा पत्रावळी दिलेली नाही, तर हे सर्व करपत्रातून (हातात भाजीभाकरी घेऊन) भोजन करतात. त्यामुळे जेवणानंतर पत्रावळी किंवा ताटाचे काय करायचे, असा प्रश्न पडत नाही.