बाबा इंदूलकर, दिलीप देसाई पत्रक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बाबा इंदूलकर, दिलीप देसाई पत्रक
बाबा इंदूलकर, दिलीप देसाई पत्रक

बाबा इंदूलकर, दिलीप देसाई पत्रक

sakal_logo
By

‘वैदिक प्रार्थनेच्या नावाखाली गैरसमज’

कोल्हापूर ः शिरोली टोलनाका येथील लॉनवर होणाऱ्या श्री महालक्ष्मी महाउत्सवाची पोस्टर सर्वत्र झळकली आहेत. त्यावर ‘डोकेदुखी, पायदुखी, पोटदुखी, कंबरदुखी, गुडघेदुखी अशा दीर्घ आजारांवर दिव्य मंत्रांनी वैदिक प्रार्थना’ अशी ठळकपणे जाहिरात केली आहे. त्यामुळे समाजात गैरसमज निर्माण होण्याची शक्यता असून कायद्यांतील औषधी व चमत्कारिक उपचार या अधिनियमांचा हा भंग असल्याचे पत्रक ॲड. बाबा इंदूलकर, दिलीप देसाई यांनी प्रसिद्धीस दिले आहे. आजवर अंबाबाई मंदिरात असो किंवा अगदी करवीर महात्म्य ग्रंथातही याबाबत कुठलेच उल्लेख नाहीत. हा कार्यक्रम जनकल्याणकारी असेल तर त्याचे उद्‌घाटन पालकमंत्र्यांच्या हस्ते का नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
............

प्रकाशक परिषदेकडून
साहित्य महामंडळांचा निषेध

कोल्हापूर ः वर्धा येथे नुकत्याच झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये साहित्य महामंडळाकडून प्रकाशक व ग्रंथ विक्रेत्यांना मिळालेल्या वागणुकीविरोधात मराठी प्रकाशक परिषदेकडून निषेध नोंदवला आहे. याबाबतचे पत्र परिषदेने अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाला पाठवले आहे.
पत्रात म्हटले आहे, प्रकाशकाने भाड्याने गाळे घ्यावेत आणि आम्ही देऊ त्या ठिकाणी, देऊ त्या सुविधांसह ग्रंथ विक्री करावी, असाच हा व्यवहार होता. ग्रंथ विक्रेत्यांना प्रत्येक वर्षी वाढीव दराने स्टॉल दिले जातात; पण सुविधा काहीच मिळत नाहीत. साहित्य संमेलनासाठी शासनाने दोन कोटींपर्यंत अनुदान देऊनही ही अवस्था आहे. हा खर्च फक्त साहित्यिक आणि त्यांच्या मंडपासाठी असतो की एकूण साहित्य संमेलनासाठी असतो, याचा खुलासाही महामंडळाने करावा. येत्या काळातही अन्याय झाला तर साहित्य संमेलनात सहभाग न नोंदवता मुख्य मंडपाच्या ठिकाणी निषेध नोंदवला जाईल.
परिषदेचे अध्यक्ष के. एस. अतकरे, कार्याध्यक्ष अनिल कुलकर्णी, सचिव संजय काकडे, खजानीस सुनीताराजे पवार, अरविंद पाटकर, सु. वा. जोशी, अवधूत जोशी, चंद्रकांत शेवाळे यांनी महामंडळासह मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सांस्कृतिक कार्यमंत्री आदींना हे पत्र पाठवले आहे.