कुंभी मतमोजणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कुंभी मतमोजणी
कुंभी मतमोजणी

कुंभी मतमोजणी

sakal_logo
By

82607
...

‘कुंभी’ची आज मतमोजणी

नेत्यांची प्रतिष्ठा पणाला : दुपारपर्यंत पहिल्या फेरीचा निकाल

कोल्हापूर, ता. १३ : कुडित्रे (ता. करवीर) येथील कुंभी - कासारी सहकारी साखर कारखान्यासाठी चुरशीने झालेल्या निवडणुकीत कोण बाजी मारणार आणि कोणाला धक्का बसणार, हे उद्या (ता. १४) मतमोजणीनंतर समजणार आहे. कसबा बावडा रमणमळा येथील शासकीय गोदाम येथे उद्या सकाळी ८ पासून मतमोजणीला सुरुवात होईल. ३५ टेबलवर आणि तीन फेऱ्यांमध्ये मतमोजणी होईल.
दरम्यान, सत्तारूढ पॅनेलकडून माजी आमदार चंद्रदीप नरके व त्यांना पाठबळ दिलेल्या आमदार सतेज पाटील, तसेच विरोधी परिवर्तन आघाडीला पाठिंब्यासह सक्रिय सहभाग असलेल्या आमदार पी. एन. पाटील, आमदार विनय कोरे, गोकुळचे माजी अध्यक्ष अरुण नरके या सर्व नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. दुपारपर्यंत पहिल्या फेरीचा निकाल जाहीर झाल्यानंतर सत्ता कोणाच्या बाजूला झुकू शकते, याचा कौल लक्षात येणार आहे.
कुंभी कारखान्यासाठी काल (ता. १२) २३ हजार ४३१ पैकी १९ हजार ३१९ मतदान झाले. एकूण ८२.४५ टक्के मतदान झाले. १०५ मतदान केंद्रांवर शांततेत चुरशीने मतदान झाले. दरम्यान, उद्या तीन फेऱ्यांमध्ये होणाऱ्या मतमोजणीमध्ये पहिल्या फेरीत कुडित्रे, वाकरे, कोपार्डे, कळंबे तर्फ कळे, भामटे तर्फ कळे, चिंचवडे, सांगरुळ, म्हारुळ, आमशी, खाटांगळे, पासार्डे, कसबा बीड, गणेशवाडी, सावरवाडी, बहिरेश्वर, शिरोली दुमाला, सडोली दुमाला, सावर्डे दुमाला गावांतील मतदान केंद्रावरील मतमोजणी होईल. त्यानंतर दुसऱ्या फेरीत चाफोडी, आरळे, घानवडे, महे, कोगे, खुपिरे, साबळेवाडी, शिंदेवाडी, वरणगे, पाडळी बुद्रुक, दोनवडे, शिंगणापूर, पाडळी खुर्द, यवलूज, माजगाव, आळते, पुनाळ, काटेभोगाव आणि तिसऱ्या फेरीत कसबा ठाणे, दिगवडे, तिरपण, कोलोली, नणंद्रे, पोहाळे, वाळोली, बोरगाव, चव्हाणवाडी, बाजार भोगाव, किसरुळ, पाटपन्हाळा, पोर्ले तर्फ बोरगाव, देसाईवाडी, माळापुडे, पाली, कसबा कळे, घरपण, निवडे, मांडुकली, सावर्डे तर्फ असंडोली, पणोरे, आकुर्डे, पणुत्रे, मासुर्ली आणि कुडित्रे (कारखाना साईट) या ठिकाणी घेतलेल्या मतदान केंद्रावरील मतमोजणी होणार आहे. दरम्यान, सर्व निकाल जाहीर होण्यास सायंकाळपर्यंत वाट पहावी लागणार आहे.
....


कोण जिंकणार?
चुरशीने झालेल्या मतदानामुळे कुंभीवर कोणाची सत्ता येणार, याबद्दल सभासदांसह जिल्ह्यातील लोकांचे लक्ष लागून राहिले आहे. गावागावांत आज दिवसभर कुंभी-कासारी कारखान्याच्या निवडणुकीचीच चर्चा सुरू राहिली.