
गड-संक्षिप्त
82618
भडगाव : समर्थ सेवा ट्रस्ट व दासनवमी उत्सव समितीतर्फे झालेल्या कथाकथन स्पर्धेतील विजेत्यांना किसन महाराज यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी मधुकर येसणे, जोतिबा पाटील, मोहन गुरव उपस्थित होते.
भडगावला कथाकथन स्पर्धा उत्साहात
गडहिंग्लज : भडगाव पैकी समर्थनगर (ता. गडहिंग्लज) येथील श्री समर्थ सेवा ट्रस्ट व दासनवमी उत्सव समितीतर्फे कथाकथन स्पर्धा झाली. दोन गटात झालेल्या या स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला. एकूण 45 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. एका संताच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंगाचे कथन हा स्पर्धेसाठी विषय होता. स्पर्धेतील विजेत्यांना रोख बक्षीस, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. परमपूज्य किसन महाराज यांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण झाले. गटनिहाय विजेते असे- (लहान गट)- भूमी पाटील (बॅ नाथ पै विद्यालय), वेण्णा पोवार (ऐनापूर), श्रद्धा बोरगल्ली (हिटणी), स्नेहल कांबळे (कुमरी), श्रेयस कुराडे (लिंगनूर). (मोठा गट)- अनुध खलिफ (हिटणी), रसिका गोटुरी (जरळी), समर्थ घोरपडे (चन्नेकुपी), साईश्री देसाई (लिंगनूर), रसिका चौगुले (वि. दि. शिंदे हायस्कूल). मधुकर येसणे, जोतिबा पाटील, मोहन गुरव यांनी परिक्षक म्हणून काम पाहिले.
--------------
82619
सुस्मिता कांबळे
सुस्मिता कांबळे हिच्या उपकरणाची निवड
नूल : जरळी (ता. गडहिंग्लज) येथील जरळी हायस्कूलची विद्यार्थिनी सुस्मिता कांबळे हिच्या उपकरणाची राज्यस्तरीय इन्स्पायर अॅवार्ड प्रदर्शनासाठी निवड झाली आहे. सुस्मिताने लेडिज डिफेन्स स्टीक हे उपकरण सादर केले होते. जिल्ह्यातून 141 उपकरणांची ऑनलाईन माहिती सादर करण्यात आली होती. यातील 14 उपकरणांची राज्यस्तरीय अॅवार्डसाठी निवड झाली आहे. यात सुस्मिताच्या उपकरणाचा समावेश आहे. हे उपकरण महिलांच्या सुरक्षिततेसाठी बनविलेले आहे. हाताळण्यास सोईचे असल्याने महिलांना प्रवासातही वापरता येते. रात्री-अपरात्री त्याचा टॉर्च म्हणूनही उपयोग करता येतो. तसेच प्रवासात मोबाईल चार्जिंगसाठीही वापरता येते. मुख्याध्यापक विठ्ठल चौगुले यांचे प्रोत्साहन तर नंदकुमार लोंढे यांचे मार्गदर्शन मिळाले.
-----------------------------
क्रिएटीव्ह अॅकॅडमीच्या परीक्षेला प्रतिसाद
गडहिंग्लज : येथील क्रिएटीव्ह हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात पुढील शैक्षणिक वर्षापासून (सन 2023-24) क्रिएटीव्ह ब्रिलियंट अॅकॅडमी सुरु करण्यात येणार आहे. त्यासाठी अॅकॅडमीमार्फत परीक्षा घेण्यात आली. त्याला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. गडहिंग्लजसह आजरा व चंदगड तालुक्यातून 240 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या परीक्षेत सोहम शेंडगे, सोहम चव्हाण, तन्वी सावंत यांनी अनुक्रमे पहिले तीन क्रमांक पटकाविले. त्यांना शैक्षणिक शुल्कात 10 टक्के सवलत दिली जाणार आहे. तसेच पहिल्या दहा क्रमांकांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना रोख बक्षीस देऊन गौरविण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर देसाई, सचिव आण्णासाहेब बेळगुद्री यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. मुख्याध्यापक दिनकर रायकर, पुजा घोरपडे, विनायक माने, अंकूर गौरुले, समीर बिरंबोळे आदी उपस्थित होते.