मागण्यांची पूर्तता लवकर करा, अन्यथा सोमवारपासून बेमुदत बंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मागण्यांची पूर्तता लवकर करा, अन्यथा सोमवारपासून बेमुदत बंद
मागण्यांची पूर्तता लवकर करा, अन्यथा सोमवारपासून बेमुदत बंद

मागण्यांची पूर्तता लवकर करा, अन्यथा सोमवारपासून बेमुदत बंद

sakal_logo
By

82757
.............


मागण्यांची पूर्तता लवकर करा;
अन्यथा सोमवारपासून बेमुदत बंद

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा इशारा; शिवाजी विद्यापीठातील द्वारसभेत निदर्शने

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर, ता. १४ ः प्रलंबित मागण्यांची पूर्तता राज्य सरकारने लवकर करावी; अन्यथा सोमवार (ता. २०) पासून बेमुदत कामबंद करण्यात येईल, असा इशारा शिवाजी विद्यापीठ सेवक संघाच्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आज दिला. त्यांनी दुपारी दोन वाजता विद्यापीठातील द्वारसभेत सरकारच्या विरोधात निदर्शने केली.
राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे व संलग्नित महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे महत्त्वाचे प्रश्न, उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालयस्तरावर गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित आहेत. याबाबत अनेकदा निवेदने, भेटी, बैठकी व आंदोलन होऊनसुद्धा शासनाची उदासीनता आणि पूर्वग्रहदूषित भावनेमुळे हे प्रश्न सुटलेले नाहीत. त्यामुळे महाराष्ट्र राज्य विद्यापीठीय व महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समितीच्या नेतृत्वाखाली आम्ही आंदोलन सुरू केले आहे. त्यातील परीक्षा कामकाजावरील बहिष्काराचा पहिला टप्पा यशस्वीपणे पार पडला. आज द्वारसभेत निदर्शने करण्यात आली, अशी माहिती शिवाजी विद्यापीठ सेवक संघाचे उपाध्यक्ष संजय पोवार, चिटणीस राम तुपे यांनी दिली.
यावेळी राजेंद्र खामकर, निशिकांत पलंगे, अनिल पाटील, कास्ट्राईब कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार सर्वांनी केला.
...

आंदोलनातील पुढील टप्पे

शिक्षकेतर कर्मचारी उद्या, बुधवारपासून काळ्या फिती लावून काम करणार आहेत. गुरुवारी (दि. १६) एकदिवसीय लाक्षणिक संप करतील. सोमवार (दि. २०) पासून बेमुदत बंद पुकारण्यात येणार असल्याची माहिती पोवार यांनी दिली.