सचिन पिळगांवकर यांना पुरस्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सचिन पिळगांवकर यांना पुरस्कार
सचिन पिळगांवकर यांना पुरस्कार

सचिन पिळगांवकर यांना पुरस्कार

sakal_logo
By

फोटो
...

अभिनेते सचिन पिळगांवकर यांना
नटश्रेष्ठ दानवे कलायात्री पुरस्कार

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर, ता. १४ ः मराठी सिने व नाट्यसृष्टीत अभिनेता, गायक, लेखक, निवेदक, निर्माता, दिग्दर्शक अशी अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या सचिन पिळगांवकर यांना यंदाचा नटश्रेष्ठ जयशंकर दानवे कलायात्री पुरस्कार जाहीर झाला आहे. एक मार्चला येथील राजर्षी शाहू स्मारक भवनात सायंकाळी साडेपाच वाजता पुरस्काराचे वितरण होणार आहे. याबाबतची माहिती जयश्री दानवे, राजदर्शन दानवे, सुधीर पेटकर यांनी आज दिली.
नटश्रेष्ठ दानवे यांच्या स्मृती चिरंतन जपण्यासाठी प्रत्येक वर्षी सिने व नाट्यसृष्टीत उल्लेखनीय काम केलेल्या व्यक्तीचा गौरव केला जातो. सिनेमात बालकलाकार म्हणून पदार्पण केलेल्या सचिन पिळगावकर यांनी किशोरवयातच अनेक सुपरहिट चित्रपट दिले. एकूण ८४ हिंदी चित्रपटांसह मराठी चित्रपटातूनही त्यांनी भूमिका साकारल्या आहेत. त्यांच्या या एकूणच कलाप्रवासाचा गौरव पुरस्काराने होणार आहे. यापूर्वी दिलीप प्रभावळकर, डॉ. मोहन आगाशे, सदाशिव अमरापूरकर, शरद पोंक्षे, अरुण नलावडे, सुबोध भावे, प्रशांत दामले, डॉ. गिरीश ओक, भरत जाधव, अविनाश व ऐश्वर्या नारकर, महेश कोठारे, सचिन खेडेकर यांना हा पुरस्कार दिला आहे. दरम्यान, एक मार्चला होणाऱ्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात सचिन पिळगावकर यांची प्रकट मुलाखत रंगणार आहे. कमला कॉलेजचे प्रा. डॉ. सुजय पाटील ही मुलाखत घेतील.