शिवराज स्कूलमध्ये स्नेहसंमेलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवराज स्कूलमध्ये स्नेहसंमेलन
शिवराज स्कूलमध्ये स्नेहसंमेलन

शिवराज स्कूलमध्ये स्नेहसंमेलन

sakal_logo
By

82863
गडहिंग्लज : शिवराज इंग्लिश मीडियम स्कूलच्या स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी आपली कला सादर केली.

शिवराज स्कूलमध्ये स्नेहसंमेलन
गडहिंग्लज : येथील शिवराज इंग्लिश मीडियम स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात झाले. नर्सरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी बहारदार गाणी व नृत्य सादर केले. छत्रपती शिवाजी महाराज, तानाजी मालुसरे यांची शौर्यगाथा सांगणारी गाणी, कोळी नृत्य, शेतकरी नृत्य, लावणी यासह रिमिक्स गाणी सादर केली. मैदानी खेळाच्या नृत्यातून परंपरा अधोरेखित करण्यात आली. तर फुटबॉल म्युझिक थीमनृत्य सादर करीत फुटबॉल परंपरेची महती मांडली. तत्पूर्वी, अभिनेता अमोल देसाई यांच्या हस्ते स्नेहसंमेलनाचे उद्‍घाटन झाले. शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे अध्यक्षस्थानी होते. सचिव डॉ. अनिल कुराडे, डॉ. सुधीर मुंज, प्रा. बीना कुराडे, श्री. हजारे, रेखा पोतदार, तानाजी कुराडे आदी उपस्थित होते. मुख्याध्यापिका गौरी शिंदे यांनी स्वागत केले. डॉ. कुराडे, श्री. देसाई यांची भाषणे झाली. फारुख ठगरी यांनी सूत्रसंचालन केले. शिक्षक, प्रशासकीय कर्मचारी, पालक, विद्यार्थी उपस्थित होते.