
गड-लोकमान्य सोसायटी
लोकमान्य सोसायटीचा वर्धापनदिन
गडहिंग्लज, ता. १५ : लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीच्या येथील शाखेचा दहावा वर्धापनदिन उत्साहात झाला. क्षेत्रिय व्यवस्थापक दिलीप पाटील, उपव्यवस्थापक आर. डी. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. ग्राहक व हितचिंतकांनी शाखेला भेट देऊन शुभेच्छा दिल्या. ‘लोकमान्य’च्या गडहिंग्लज शाखेने ४० कोटींच्या ठेवी पूर्ण केल्या. शाखा प्रगतीपथावर आहे. ठेवीदारांच्या विश्वासावरच वाटचाल केल्याचे दिलीप पाटील यांनी सांगितले. जनता बँकेचे शाखाधिकारी जोतिबा पाटील, वीज मंडळ पतसंस्थेचे व्यवस्थापक गंगाराम पाटील, संदीप तोडकर, गीता चिंचणीकर, विजय चिंचणीकर, मुकुंद देसाई, सुभाष गुरव, वसंत शेटके, अरविंद येसरे, निजगुणी स्वामी, पांडुरंग हरेर, विनायक सासुलकरसह ग्राहक, हितचिंतकांनी शुभेच्छा दिल्या. शाखाधिकारी सीमा जोशी यांनी स्वागत केले. उपशाखाधिकारी वैभव देशपांडे, मैथिली कुलकर्णी, रोहन पाटील, विशाल परिट, सुरेश जरळी उपस्थित होते.