
वीज दरवाढीला विरोध
82951
गडहिंग्लज : वीज दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने प्रांत कार्यालयाचे नायब तहसीलदार जीवन क्षीरसागर यांना निवेदन दिले.
वीज दरवाढीला राष्ट्रवादीचा विरोध
प्रस्तावित वाढ रद्द करा; राष्ट्रवादीचे प्रांत कार्यालयाला निवेदन
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १५ : महावितरणने केलेल्या प्रस्तावित ३७ टक्के वीज दरवाढीवर आयोगाने हरकती मागवल्या आहेत. या दरवाढीला राष्ट्रवादी काँग्रेसने विरोध दर्शविला आहे. त्यासंदर्भातचे निवेदन प्रांत कार्यालयाला आज देण्यात आले.
खर्च वाढला, करा दरवाढ ही वीज कंपनीची मानसिकता अकार्यक्षमता दर्शविते. वीज चोऱ्या व भ्रष्ट्राचाराला मान्यता व प्रोत्साहन देणारी कार्यपद्धती बंद झाली पाहिजे. स्पर्धा, कार्यक्षमता, प्रामणिकपणा व इच्छाशक्ती या आधारावर एकूण खर्चावर कठोर नियंत्रण आणणे आवश्यक आहे. दुर्दैवाने ही इच्छाशक्ती वीज कंपनीकडे कधीच नव्हती आणि नाही. याचा अनुभव ग्राहकांना २३ वर्षापासून येत आहे. महावितरण कंपनीने ३७ टक्के वीजदरवाढीची मागणी केली आहे. २३ वर्षातील ही सर्वात मोठी दरवाढ आहे. राज्यात सर्वाधिक वीजेचे दर असूनही इतकी प्रचंड मागणी सर्वसामान्य ग्राहकांना शॉक देणारी आहे. ही दरवढ राज्यात येवू घातलेल्या उद्योगांना रोखणारी व अस्तित्वातील उद्योगांना राज्याबाहेर घालवणारी आहे. वीज दरात अतिरेक भर पडल्यास त्याचे संतप्त पडसाद राज्यभर उमटणार आहेत. यामुळे राज्य सरकारने यामध्ये त्वरीत हस्तक्षेप करावा. नागरिकांच्या दृष्टीने हिताचा निर्णय घ्यावा. याबाबत योग्य निर्णय न झाल्यास वाढीव दराच्या प्रस्तावाची होळी करुन आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. शहराध्यक्ष सिद्धार्थ बन्ने, सुरेश कोळकी, रेश्मा कांबळे, हारुण सय्यद, रमजान अत्तार, अमर मांगले, अवधूत रोटे, उदय परीट, संजय बाडकर, संतोष कांबळे, रश्मिराज देसाई, महेश गाडवी, तुषार यमगेकर, आण्णासाहेब देवगोंडा, जोतिबा भिकले, इकबाल सनदी, मारुती कांबळे आदींच्या शिष्टमंडळाने निवेदन दिले.