
विद्या प्रसारक मंडळाकडून पाच टन धान्य
gad153.jpg
82956
गडहिंग्लज : विद्याप्रसारक मंडळातर्फे सुमंगलम् पंचमहाभूत महोत्सवासाठी धान्य जमा केले. यावेळी डॉ. सतीश घाळी, किशोर हंजी, सुनील देसाई, एस. एन. तांबे उपस्थित होते.
----------------------------
विद्याप्रसारक मंडळाकडून पाच टन धान्य
गडहिंग्लज, ता. १६ : सिद्धगिरी मठ (कणेरी) येथे सुमंगलम् पंचमहाभूत महोत्सव साजरा होणार आहे. या महोत्सवासाठी पाच टन धान्य आणि १२०० नग कपडे दिले. सिद्धगिरी मठावर २० ते २६ फेब्रुवारीदरम्यान सुमंगल महोत्सवातंर्गत पृथ्वी, अग्नी, तेज, जल आणि वायू या पंचमहाभूतांचे महत्त्व विशद केले जाणार आहे. त्यासाठी देश-विदेशातून ३० लाख लोक येण्याची अपेक्षा आहे. या पार्श्वभूमीवर अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामींनी सेवाभावी संस्थांना सहकार्याचे आवाहन केले आहे. त्याला प्रतिसाद देत विद्याप्रसारक मंडळातर्फे पाच टन धान्य व कपडे दिले. डॉ. घाळी महाविद्यालय, जागृती हायस्कूल, आर. के. कनिष्ठ महाविद्यालय, जागृती प्राथमिक विद्यामंदिर, न्यू होराईझन स्कूल, जागृती शिक्षणशास्त्र महाविद्यालय, पार्वती हायस्कूल, एस. डी. हायस्कूल या विद्याशाखांतर्फे गहू, तांदूळ, ज्वारी, विविध प्रकारच्या डाळी, तिखट, रवा, साखर असे पाच टन साहित्य व कपडे जमा केले. संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. सतीश घाळी, सहसचिव गजेंद्र बंदी, संचालक किशोर हंजी, प्राचार्य डॉ. मंगलकुमार पाटील, विजय चौगुले, एस. एन. तांबे, विलास शिंदे, डॉ. एस. एन. शिंदे, सुनील देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थ्यांनी धान्य जमा केले.