चर्चेचे इतिवृत्त मिळाल्यानंतरच आंदोलन स्थगितीबाबत निर्णय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चर्चेचे इतिवृत्त मिळाल्यानंतरच आंदोलन स्थगितीबाबत निर्णय
चर्चेचे इतिवृत्त मिळाल्यानंतरच आंदोलन स्थगितीबाबत निर्णय

चर्चेचे इतिवृत्त मिळाल्यानंतरच आंदोलन स्थगितीबाबत निर्णय

sakal_logo
By

लिखित इतिवृत्त मिळाल्यावरच
आंदोलनाबाबत पुढील निर्णय
---
उपमुख्यमंत्र्यांशी कृती समितीची चर्चा; विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा आज लाक्षणिक संप
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १५ ः विविध प्रलंबित मागण्यांबाबत महाराष्ट्र राज्य विद्यापीठीय व महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समितीच्या शिष्टमंडळाची आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी मुंबईत सकारात्मक चर्चा झाली. मात्र, या चर्चेचे लिखित इतिवृत्त मिळाल्यावरच सध्या सुरू असलेले परीक्षा कामकाजावरील बहिष्कार आंदोलन स्थगित करायचे की सुरू ठेवायचे, याबाबतचा पुढील निर्णय कृती समिती घेणार आहे. चर्चेनंतर दिवसभरात इतिवृत्त मिळाले नसल्याने समितीने उद्या (ता. १६) लाक्षणिक संप करण्याचा निर्णय कायम ठेवला आहे.
मुंबईतील मलबार हिल येथील मेघदूत बंगल्यात आज दुपारी बाराला कृती समितीचे शिष्टमंडळ आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यातील बैठक सुरू झाली. वीस मिनिटे चाललेल्या बैठकीत सुधारित सेवांतर्गत आश्‍वासित प्रगती योजना पूर्ववत लागू करणे, सातव्या वेतन आयोगातील तरतुदीनुसार लाभाची योजना लागू करणे, ५८ महिन्यांची सातव्या वेतन आयोगानुसार वाढीव वेतनाच्या फरकाची रक्कम देणे आदी मागण्यांबाबत उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सकारात्मकता दर्शविली. रिक्त पदांचा आढावा घेऊन भरती प्रक्रिया राबविण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. या चर्चेचे लिखित इतिवृत्त मिळाल्यावर आंदोलनाबाबत पुढील निर्णय घेण्यात येईल, असे आम्ही त्यांना सांगितले असल्याची माहिती कृती समितीचे मुख्य संघटक मिलिंद भोसले आणि आनंद खामकर यांनी दिली.
या बैठकीस वित्त विभागाचे मुख्य सचिव मनोज सौनिक, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे सचिव विकासचंद्र रस्तोगी, उच्चशिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, कृती समितीचे प्रमुख संघटक अजय देशमुख, मुख्य संघटक रावसाहेब त्रिभुवन, सुनील धिवार, प्रकाश म्हसे, दीपक मोरे, आर. बी. सिंग, राजा बढे उपस्थित होते.
...

विद्यापीठात काळ्या फिती लावून काम
या आंदोलनांतर्गत शिवाजी विद्यापीठ सेवक संघाच्या पदाधिकारी, सभासद, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आज काळ्या फिती लावून काम केले. त्यांनी दुपारी दोनला विद्यापीठाच्या मुख्य इमारतीच्या प्रवेशद्वारात सभा घेऊन मागण्यांच्या अनुषंगाने घोषणा दिल्या. उद्या एकदिवसीय लाक्षणिक संपाचा निर्धार त्यांनी केला.