आरोपीला शिक्षा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आरोपीला शिक्षा
आरोपीला शिक्षा

आरोपीला शिक्षा

sakal_logo
By

फोटो क्रमांक : gad159.jpg : जुम्माशा खलीफा
--------------------------------------

अल्पवयीन मुलीचा विनयभंग;
एकाला पाच वर्षे सक्तमजुरी
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १५ : नऊ वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याचा आरोप सिद्ध झाल्याने जुम्माशा काशिम फलीफा (वय ५२, रा. महागाव, ता. गडहिंग्लज) याला पाच वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश ए. आर. उबाळे यांनी आज हा निकाल दिला. सरकारतर्फे अ‍ॅड. एस. ए. तेली यांनी काम पाहिले.
याबाबतची माहिती अशी, १९ मार्च २०२० रोजी सकाळी साडेअकरा ते पावणेबाराच्या सुमारास पीडित मुलगी व तिची मैत्रीण खाऊ आणण्यासाठी जात होत्या. त्यावेळी जुम्माशाने तिच्या मैत्रीणीला भीती दाखवून पाठविले व पीडितेला मानेला धरून तो एका ठिकाणी घेऊन गेला. तेथे खिशातून दोरी काढत ‘ओरडू नकोस नाही तर हात-पाय बांधून पाण्यात टाकण्याची भीती दाखविली आणि तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न करताना पीडित मुलगी त्याला लाथ मारुन पळून आली.’ या घटनेची फिर्याद नोंदल्यानंतर जुम्माशा विरोधात पोक्सो कायद्यान्वये विनयभंगाचा गुन्हा दाखला केला.
तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक डी. ए. काशीद यांनी तपासाअंती जुम्माशाला अटक करून त्याच्या विरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. याप्रकरणी सरकारतर्फे सात साक्षीदार तपासले. त्यांची साक्ष, पुरावे आणि सरकारी वकील अ‍ॅड. एस. ए. तेली यांचा युक्तीवाद ग्राह्य मानून न्या. उबाळे यांनी जुम्माशाला पोक्सो कलमान्वये ५ वर्षे सश्रम कारावास, दहा हजार दंड, दंड न भरल्यास दोन महिने सश्रम कारावास, विनयभंगप्रकरणी ३ वर्षे सश्रम कारावास, पाच हजार दंड व दंड न भरल्यास एक महिना साधी कैद अशी शिक्षा ठोठावली. दोन्ही शिक्षा एकाचवेळी भोगण्याच्या आदेश आहेत.