Tue, March 21, 2023

भाजप बैठक बातमी
भाजप बैठक बातमी
Published on : 15 February 2023, 5:49 am
83095
...
लोकसभा तयारीच्या आढाव्यासाठी भाजपची बैठक
गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आज भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक झाली. यात दौऱ्याचा आढावा घेऊन कोणी कोणती जबाबदारी घ्यायची, याची माहिती प्रमुख कार्यकर्त्यांनी दिली. बालाजी लॉन येथे ही बैठक झाली. बैठकीत दौऱ्याच्या वेळी कोणत्या गोष्टींची दक्षता घेतली पाहिजे, याबाबत चर्चा झाली. लोकसभा प्रवास योजनेचा आढावा अमित शहा घेणार आहेत. त्याची तयारीही या बैठकीत करण्यात आली. या वेळी पश्चिम महाराष्ट्र संघटनमंत्री मकरंद देशपांडे, खासदार धनंजय महाडिक, जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे, माजी आमदार सुरेश हाळवणकर, अमल महाडिक, जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, महेश जाधव, हिंदूराव शेळके यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.