जैन संघटनेच्या अध्यक्षपदी किरण संगाज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जैन संघटनेच्या अध्यक्षपदी किरण संगाज
जैन संघटनेच्या अध्यक्षपदी किरण संगाज

जैन संघटनेच्या अध्यक्षपदी किरण संगाज

sakal_logo
By

gad161.jpg :
83102
किरण संगाज, संतोष कोरडे
-------------------------
जैन संघटनेच्या अध्यक्षपदी किरण संगाज
गडहिंग्लज, ता. १६ : भारतीय जैन संघटनेच्या गडहिंग्लज विभाग अध्यक्षपदी किरण संगाज यांची, तर सचिवपदी संतोष कोरडे यांची निवड केली. २०२३ ते २०२५ या कालावधीसाठी ही निवड झाली आहे. संघटनेच्या बैठकीत या निवडी केल्या. तसेच उपाध्यक्षपदाची महेंद्र शहा व भीमाप्पा शिखरी यांच्यावर तर खजिनदारपदाची रामू शेरवी यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे.
किरण संगाज यांच्याकडे संघटनेच्या कार्याचा मोठा अनुभव आहे. त्यांच्या अनुभवाचा संघटनेला फायदा होऊ शकतो, असे मत संघटक प्रा. सुभाष पाटील यांनी व्यक्त केले. युवती सक्षमीकरण हा जैन संघटनेचा अत्यंत महत्त्वाचा उपक्रम आहे. त्याला व्यापक स्वरूप देण्याचा मानस श्री. संगाज व श्री. कोरडे यांनी निवडीनंतर व्यक्त केला. बैठकीला माजी अध्यक्ष प्रा. अनिल उंदरे, महिला अध्यक्षा बिना शहा आदी उपस्थित होते.