शिवाजी विद्यापीठात शहीद गोविंद पानसरे यांचे अध्यासन स्थापन करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवाजी विद्यापीठात शहीद गोविंद पानसरे यांचे अध्यासन स्थापन करा
शिवाजी विद्यापीठात शहीद गोविंद पानसरे यांचे अध्यासन स्थापन करा

शिवाजी विद्यापीठात शहीद गोविंद पानसरे यांचे अध्यासन स्थापन करा

sakal_logo
By

83234

‘शहीद पानसरे’ अध्यासन
आता तरी सुरू करा

स्मृती अभिवादन समितीचे प्रभारी कुलसचिवांना निवेदन

कोल्हापूर, ता. १६ ः ज्येष्ठ विचारवंत गोविंद पानसरे यांच्या नावाने शिवाजी विद्यापीठात अध्यासन सुरू करावे, अशी मागणी करून सात वर्षे झाली. आता तरी हे अध्यासन सुरू करा, अशी मागणी शहीद गोविंद पानसरे स्मृती अभिवादन समितीने आज केली. त्याबाबतचे निवेदन समितीने प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांना दिले.
विद्यापीठात पानसरे अध्यासन करण्याबाबत समितीने २०१६ मध्ये प्रशासनाला निवेदन दिले होते. तेव्हापासून प्रशासनाने कार्यवाही केली नाही. आता त्यांचा आठवा स्मृतिदिन आहे. किमान आता तरी विद्यापीठ प्रशासनाने जागे होऊन यावर्षीच हे अध्यासन सुरू करावे, अशी मागणी समितीने केली. त्यावर डॉ. शिंदे म्हणाले, ‘विद्यापीठ या अध्यासनाबाबत सकारात्मक आहे. शक्य तितक्या लवकर हा प्रस्ताव विद्यापीठाच्या विविध समित्यांकडे तांत्रिक प्रक्रियेसाठी पाठवून पूर्तता केली जाईल.’ शिष्टमंडळात शिवाजीराव परुळेकर, अनिल चव्हाण, गिरीश फोंडे, श्वेता परुळेकर, प्रशांत आंबी, जावेद तांबोळी, व्यंकाप्पा भोसले, आरती रेडेकर, मधुकर पाटील, धीरज कठारे, चंद्रकांत बागडी, नीलेश कसबे, खुशी ढंग, रवींद्र जाधव उपस्थित होते.

चौकट
आंदोलन करण्याची वेळ आणू नये
पानसरे यांनी विद्यापीठात अध्यापन केले आहे. ते अधिसभा सदस्य होते. त्यांचे योगदान पाहता त्यांच्या नावचे अध्यासन होणे विद्यापीठासाठी भूषणावह आहे. या मागणीसाठी कष्टकरी जनता, पुरोगामी कार्यकर्त्यांना आंदोलन करण्याची वेळ विद्यापीठ प्रशासनाने आणू नये, अशी विनंती या समितीने केली.