सूताचा तपशील सविस्तर द्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सूताचा तपशील सविस्तर द्या
सूताचा तपशील सविस्तर द्या

सूताचा तपशील सविस्तर द्या

sakal_logo
By

सुताचा तपशील सविस्तर द्या
पॉवरलूम असोसिएशनची मागणी; ‘यार्न मर्चंट’ला निवेदन

इचलकरंजी, ता. १६ : बाचक्यावर तसेच कोनावर सुताचा सविस्तर तपशील देण्यास व्यापारी टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे यंत्रमागधारक व ट्रेडींगधारक यांच्यात वादावादी होत आहे. याप्रश्नी आज इचलकरंजी पॉवरलू्म विव्हर्स असोसिएशनतर्फे यार्न मर्चंट असोसिएशनला निवेदन दिले. याबाबत सविस्तर तपशील देण्याबाबत सभासदांना सूचना देण्याची मागणी केली आहे.
सूत विक्री बिलांवर सुताचे नाव, त्याचा प्रकार, त्याचा काऊंट व मिक्सिंगचे प्रमाण याचा तपशील असणे आवश्यक असते, पण तसा तपशील दिला जात नसल्याच्या तक्रारी यंत्रमागधारकांकडून असोसिएशनकडे आलेल्या आहेत. यंत्रमागधारक कापड उत्पादन करीत असताना कमी कापड येत असल्यामुळे टेस्टींग लॅबमधून सुताचा काऊंट काढला आहे. त्यावेळी कोनावर सुताच्या तपशिलाचा स्टिकर नसल्याने टेस्टिंग लॅबवाले अननोन मिल असा शेरा मारून रिपोर्ट देत आहेत. रिपोर्टमध्ये आलेला काऊंट व प्रत्यक्षात ट्रेडिंगधारकाने दिलेल्या सुताच्या काऊंटमध्ये फरक पडत आहे. यंत्रमागधारकांनी याची विचारणा ट्रेडिंगधारकाकडे केली असता मतभेद होऊन वादावादीचे प्रसंग घडत आहेत. असे प्रसंग टाळण्यासाठी सुताच्या बाचक्यांवर तसेच कोनावर संबंधित तपशील लावण्यासाठी बंधनकारक करूनच सुताची विक्री करावी, अशी मागणी निवेदनात केली आहे. याबाबतची माहिती अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली.