Tue, March 28, 2023

ब्रह्माकुमारीज आर्ट अँड कल्चर विंग मार्फत कलाप्रदर्शन
ब्रह्माकुमारीज आर्ट अँड कल्चर विंग मार्फत कलाप्रदर्शन
Published on : 16 February 2023, 4:25 am
‘ब्रह्माकुमारीज’तर्फे
२१ पासून कलाप्रदर्शन
कोल्हापू, ता. १६ : महाशिवरात्रीनिमित्ताने ब्रह्माकुमारी सेंटरतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. त्यामध्ये परमपिता परमात्मा शिवबाबांच्या कलादालनात मंगळवारी (ता. २१) व बुधवारी (ता. २२) चित्रप्रदर्शन व कलामहर्षी बाबूराव पेंटर यांचे मराठी चित्रपटसृष्टीला लाभलेले महान योगदान या विषयावर प्रदर्शन होईल. राजर्षी छत्रपती शाहू स्मारक भवनात हे प्रदर्शन होईल. प्रदर्शनाची वेळ सकाळी नऊ ते सायंकाळी सात वाजेपर्यंत आहे. या प्रदर्शनाला भेट देण्याचे आवाहन ब्रह्माकुमारीजच्या कोल्हापूर सेंटरच्या संचालिका राजयोगिनी सुनंदा बहेनजी यांनी केले आहे.