सतेज चषक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सतेज चषक
सतेज चषक

सतेज चषक

sakal_logo
By

‘सतेज चषक’ फुटबॉल २० पासून
दोन लाख बक्षीस; महिला प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉ तून पैठणी
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १६ : पाटाकडील तालीम मंडळ व डॉ. डी. वाय. पाटील ग्रुपतर्फे ‘सतेज चषक’ जिल्हास्तरीय वरिष्ठ गट फुटबॉल स्पर्धेस २० फेब्रुवारीपासून सुरवात होत आहे. (कै.) पांडबा जाधव व (कै.) रावसाहेब सरनाईक यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा असून, विजेत्यास दोन लाख रुपये व चषक देण्यात येणार आहे. छत्रपती शाहू स्टेडियमवर स्पर्धेचे आयोजन केले आहे, अशी माहिती संभाजीराव पाटील-मांगोरे व शरद माळी यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, स्पर्धेसाठी महिला प्रेक्षकांचा सहभाग वाढावा, यासाठी महिलांमधून लकी ड्रॉच्या माध्यमातून रोज एक विजेत्या महिलेला पैठणी साडी भेट देण्यात येणार आहे.
पाटील-मांगोरे म्हणाले, ‘उपविजेत्यास एक लाख रुपये व चषक, तर तृतीय व चतुर्थ क्रमांकाच्या संघांना प्रत्येकी रोख पंचवीस हजार रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. उत्कृष्ट गोलरक्षक, बचावपटू, मध्यफळीतील खेळाडू, आघाडी फळीतील खेळाडूला प्रत्येकी पंधरा हजार रुपयांची भेटवस्तू, तर रोजच्या सामन्यातील व साखळी सामन्यातील सामनावीरासाठी दीड हजार रुपयांची भेटवस्तू दिली जाईल.’
माळी म्हणाले, ‘शहराच्या विविध भागांत मोक्याची ठिकाणी वरिष्ठ आठ संघांतील खेळाडूंच्या प्रतिमा असणारे १५ बाय २० फुटांचे बॅनर लावले जाणार आहेत. स्थानिक फुटबॉल खेळाडूंची प्रतिमा असणारे स्टीकर छपाई करण्यात येणार आहेत. शाहू स्टेडियमच्या मुख्य रस्त्यावर दोन मोठ्या कमानी खेळाडूंच्या पोस्टरने सुशोभित करण्यात येतील.’ स्पर्धेसाठी महिला प्रेक्षकांचा सहभाग वाढावा, यासाठी महिलांमधून लकी ड्रॉच्या माध्यमातून रोज एक विजेत्या महिलेला पैठणी साडी भेट देण्यात येणार आहे. महिलांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था केली जाणार आहे. स्पर्धेसाठी येणाऱ्या पुरुष प्रेक्षकांनादेखील दररोज लकी ड्रॉच्या माध्यमातून विजेत्यांना कुपन दिले जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेस राजेंद्र ठोंबरे, संपत जाधव, संदीप सरनाईक, त्रिवेंद्रम नलवडे, विजय साळोखे, दीपक चोरगे, दिलीप साळोखे उपस्थित होते.