एसआयएलसी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एसआयएलसी
एसआयएलसी

एसआयएलसी

sakal_logo
By

लोगो- 83280

गावरान अंडी कुक्कुटपालनातील संधी, करार पद्धती
---
येत्या २५ ला कोल्हापुरात एकदिवसीय विशेष कार्यशाळा
कोल्हापूर, ता.१६ ः गावरान अंडी खाण्याकडे ग्राहकांचा वाढता कल आहे. ही बाब लक्षात घेतली तर हा व्यवसाय करार पद्धतीने करून स्टार्टअपलाही संधी आहेत. करार पद्धतीत अंडी देणारे पक्षी मिळण्यापासून त्यांचे निवारा, खाद्य-पाणी व्यवस्थापन, लसीकरण आदी सर्व गोष्टींसाठी सहाय्य तसेच उत्पादित केलेल्या अंड्यांना हमखास मार्केट उपलब्ध होऊ शकते. आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी हा उत्तम व्यवसाय ठरू शकतो. कमीत कमी ५०० पक्ष्यांपासून व्यवसाय सुरू करण्यापासून ते मोठ्या स्तरावर कसा वाढवावा, याबाबत सविस्तर मार्गदर्शन करणारी एकदिवसीय कार्यशाळा २५ फेब्रुवारीला ‘सकाळ-ॲग्रोवन’ संलग्न शैक्षणिक संस्था ‘एसआयआयएलसी’तर्फे कोल्हापुरात आयोजिली आहे.

कार्यशाळेतील विषय ः
- लेअर कुक्कुटपालनाचे महत्त्व
- विकसित पक्ष्यांच्या विविध जाती, उपजाती
- पक्ष्यांचे शेड, लिटर, पाणी व खाद्य व्यवस्थापन
- औषध व लसीकरण व्यवस्थापन
- व्यवसायाचे अर्थशास्त्र- भांडवली गुंतवणूक
- व्यवसायाचा प्रकल्प आराखडा

तज्ज्ञांचे मार्गदर्शन
दिलेल्या विषयांबरोबरच चिकन व अंड्यांचे विक्री व्यवस्थापन, अंड्यांची हमीभावात खरेदी, पोल्ट्री यशस्वी करण्याची सूत्रे, व्यवसायासाठी शासकीय अनुदान आदींविषयी या विषयातील तज्ज्ञ मार्गदर्शन करतील. जेवण, चहा, डिजिटल प्रमाणपत्रासह प्रतिव्यक्ती १५०० रुपये शुल्क आहे.
कार्यशाळेची वेळ ः सकाळी १० ते सायंकाळी ५
कार्यशाळेचे ठिकाण ः ‘सकाळ’ कार्यालय, शिवाजी उद्यमनगर, पार्वती चित्रमंदिराजवळ, कोल्हापूर

अधिक माहिती व नावनोंदणीसाठी संपर्क : ९१७५७२४३९९.