मुकादमांकडून लूटप्रश्‍नी ‘स्वाभिमानी’ आवाज उठवेल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुकादमांकडून लूटप्रश्‍नी ‘स्वाभिमानी’ आवाज उठवेल
मुकादमांकडून लूटप्रश्‍नी ‘स्वाभिमानी’ आवाज उठवेल

मुकादमांकडून लूटप्रश्‍नी ‘स्वाभिमानी’ आवाज उठवेल

sakal_logo
By

61697
-------------
मुकादमांकडून लूटप्रश्‍नी
‘स्वाभिमानी’ आवाज उठवेल
---
राजू शेट्टी; उत्पादकांसह ऊस वाहतूकदारांना न्याय देऊ
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १६ : अलीकडील काही वर्षांपासून ऊसतोड टोळ्यांच्या मुकादमांकडून ऊस वाहतूकदारांची मोठ्या प्रमाणात लूट सुरू झाली आहे. दोन वर्षांत राज्यभरातील वाहतूकदारांचे ४६८ कोटी रुपये बुडाले. या प्रश्‍नावर आता महाराष्ट्र राज्य स्वाभिमानी ऊसतोडणी मजूर, वाहतूकदार संघटनेच्या माध्यमातून आवाज उठवणार आहे, असे प्रतिपादन माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज पत्रकार परिषदेत केले.
ते म्हणाले, की दरवर्षी वाहनधारक कर्ज काढून ऊसतोड टोळ्यांसाठी मुकादमांना बिनव्याजी अ‍ॅडव्हान्स देतात. मुकादम मात्र मजुरांना व्याजाने पैसे देतात. कारखानेही मुकादमांना प्रतिटनामागे कमिशन देतात. म्हणजे काहीच न करता मुकादम लाखो कमावतो. याशिवाय, टोळ्या न पाठविता वाहतूकदारांचे पैसेही बुडवतो. यात वाहतूकदारांची लाखोंची फसवणूक होते. बुडालेले पैसे मागण्यासाठी गेल्यावर वाहतूकदारांवर हल्ले होण्यासह विविध खोट्या गुन्ह्यांत अडकवले जाते. वाहतूकदारांवरचा हा अन्याय आता स्वाभिमानी खपवून घेणार नाही. बांधकाम कामगार कल्याण मंडळाप्रमाणे (कै.) गोपीनाथ मुंडे ऊसतोडणी कामगार कल्याण मंडळाला राज्य व केंद्र सरकारने प्रत्येकी दोन हजार कोटींचे अनुदान देऊन सक्षम करावे. त्यातून ऊसतोडणी मजुरांना विविध सवलतींच्या योजनांसह आरोग्य, शिक्षणासाठी मदत मिळेल. हा धोरणात्मक निर्णय घेण्यास शासनाला भाग पाडण्यासाठी स्वाभिमानी संघटना रस्त्यावर उतरून पाठपुरावा करेल. या वेळी राज्य सचिव राजेंद्र गड्ड्यान्नावर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
--------------
ऊसतोड मजूर मंडळाचे फायदे...
- मजुरांची नोंदणी झाल्याने ते पळून जाणार नाहीत
- ऊसतोडीचे आवश्यक साहित्य मोफत मिळेल
- अ‍ॅडव्हान्स बिनव्याजी देता येईल
- वाहतूकदारांची फसवणूक थांबेल
- वाहतूकदार, मजूर, उत्पादकांचेही शोषण थांबेल