क्रिप्टो करन्सी --मुळ बातमीत जोड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

क्रिप्टो करन्सी --मुळ बातमीत जोड
क्रिप्टो करन्सी --मुळ बातमीत जोड

क्रिप्टो करन्सी --मुळ बातमीत जोड

sakal_logo
By

सूक्ष्म तपासासाठी सायबर
सेलची मदत घेणार ः पाटील

कोल्हापूर, ता. १६ ः ‘क्रिप्टो’ करन्सीच्या नावाखाली झालेल्या गुन्ह्याचा सूक्ष्म तपास करावा लागणार आहे. यासाठी सायबर सेलची मदत घेणार असल्याची माहिती आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी आज दिली. याबाबतचा गुन्हा गांधीनगर पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे. नुकताच तो आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे वर्ग केला आहे.
निरीक्षक पाटील यांनी सांगितले, की क्रिप्टो करन्सीच्या नावाखाली कोट्यवधीची फसवणूक झाली आहे. मात्र, या फसवणुकीत कोठेही रोख रक्कम दिलेली नाही. केवळ क्वॉईनद्वारेच ही फसवणूक झाली आहे. त्यामुळे हा तपास करताना सायबर सेलकडून मदत घ्यावी लागणार आहे. तांत्रिक बाबींवरच पूर्ण तपास अवलंबून आहे. नुकताच पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या सुचनेनुसार हा तपास गांधीनगर पोलिसांकडून आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे दिला आहे. यामध्ये झालेली फसवणूक ही पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीची आहे. गुंतवणूकदारांनाही क्वॉईनच्या माध्यमातून ही गुंतवणूक केली आहे आणि त्याबदल्यात त्यांना क्वॉईन मिळालेले आहेत. त्यामुळे तपासात तांत्रिक बाबींचा सूक्ष्म अभ्यास करावा लागणार आहे.