जरळी येथे सिद्धेश्‍वर देवाची आजपासून यात्रा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जरळी येथे सिद्धेश्‍वर देवाची आजपासून यात्रा
जरळी येथे सिद्धेश्‍वर देवाची आजपासून यात्रा

जरळी येथे सिद्धेश्‍वर देवाची आजपासून यात्रा

sakal_logo
By

जरळी येथे सिद्धेश्‍वर
देवाची आजपासून यात्रा
नूल, ता. १७ ः जरळी (ता. गडहिंग्लज) येथील ग्रामदैवत श्री सिद्धेश्‍वर देवाची वार्षिक यात्रा शनिवार (ता. १८) व रविवारी (ता. १९) होत आहे. यात्रेनिमित्त ग्रामपंचायत व यात्रा समितीने विविध स्पर्धा आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
उद्या सकाळी देवास अभिषेक, पालखी मिरवणूक व वाजंत्री कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी सहाला जरळी स्पोर्टस्‌तर्फे ६५ किलोच्या आतील वजन गटातील खुल्या कबड्डी स्पर्धा होतील. विजेत्यांना अनुक्रमे ७००१, ५०००१, ३००१ रुपयांचे बक्षीस आहे. रविवारी यात्रेचा मुख्य दिवस आहे. सकाळी दंडवत, नैवेद्य आदी धार्मिक कार्यक्रम होतील. दुपारी बैलगाडी, घोडागाडी शर्यती होतील. बैलगाडीसाठी अनुक्रमे १०००१, ७००१, ५००१, तर घोडागाडीसाठी ३००१, २००१, १५०१ रुपये अशी बक्षिसे आहेत. त्यानंतर पालखी भेटीचा कार्यक्रम होईल. रात्री ‘राधाकृष्ण’ हे नाटक होणार आहे. सोमवारी (ता. २०) आदर्श ग्रुप मार्फत खुल्या रेकॉर्ड डान्स स्पर्धा होतील. पहिल्या चार क्रमांकांना १०००१, ७००१, ५००१, ३००१ अशी बक्षीस असतील. सरपंच सागर पाटील, रवींद्र दुंडगे, काकासो दुंडगे, सुनील चोथे, भीमगोंडा पाटील, मल्लेश तोरस्कर यांच्यासह ग्रामपंचायत व यात्रा समितीचे सदस्य यात्रेचे नियोजन करीत आहेत.