दौलतची बीले जमा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दौलतची बीले जमा
दौलतची बीले जमा

दौलतची बीले जमा

sakal_logo
By

फोटो chd१७४.jpg
83504
मानसिंग खोराटे
-------------------------------
‘दौलत-अथर्व’ची
३१ अखेरची बिले जमा

मानसिंग खोराटे; ३ लाख ५६ हजार टन गाळप

चंदगड, ता. १७ ः हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत-अथर्व कारखान्याने १६ ते ३१ जानेवारीअखेर गाळप झालेल्या उसाची बिले संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली आहेत. ६६ हजार ५४१ टन उसाचे गाळप झाले. त्याचे प्रतिटन ३००१ रु.प्रमाणे १९ कोटी ९६ लाख ९० हजार रुपये उत्पादकांच्या खात्यावर जमा केल्याचे अध्यक्ष मानसिंग खोराटे यांनी सांगितले.
कारखान्यात ९३ दिवसांत ३ लाख ५६ हजार टन गाळप पूर्ण झाले. कारखाना कार्यक्षेत्रात ६० टोळ्यांचे अतिरिक्त करार करून तोडणी-ओढणीचे नियोजन केले आहे. चंदगड, आजरा, गडहिंग्लज विभागातील शेतकऱ्यांनी दाखवलेला विश्वास, शेती विभाग व अन्य सर्वच विभागांच्या कामगारांचे कष्ट यामुळे हे शक्य झाले. शिल्लक ऊस गाळप करणार असल्याचे मुख्य शेती अधिकारी युवराज पाटील यांनी सांगितले. यावेळी संचालक विजय पाटील, युनिट हेड ए. आर. पाटील, सचिव विजय मराठे, जनसंपर्क अधिकारी दयानंद देवण, व्यवस्थापक सुनील चव्हाणसह खातेप्रमुख उपस्थित होते.