आजरा ः बाह्य वळण रस्ता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजरा ः बाह्य वळण रस्ता
आजरा ः बाह्य वळण रस्ता

आजरा ः बाह्य वळण रस्ता

sakal_logo
By

सरोळी-निंगुडगे
बायपासला मंजुरी
भादवण, ता. १७ ः सरोळी ते निंगुडगे बाह्यवळण (बायपास) रस्त्याला मंजुरी मिळाली. दोन किलोमीटर इतका रस्ता होणार असून खडीकरण व डांबरीकरणासाठी साठ लाखांचा निधी मंजूर झाला. याचे उद्घाटन आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते झाले, अशी माहिती तालुका संघाचे अध्यक्ष एम. के. देसाई यांनी दिली आहे.
सरोळी ते निंगुडगे बाह्यवळण (बायपास) रस्ता व्हावा अशी मागणी होत होती. यामुळे दोन गावांतील अंतर कमी होणार आहे. ग्रामस्थांना शेतीच्या कामासाठी, विद्यार्थांना शिक्षणासाठी ये- जा करणे सुखकर होणार आहे. त्याचबरोबर कोवाडे, पेद्रेवाडी, हाजगोळी खुर्द व हाजगोळी बुद्रक या गावांचा लांबचा फेरा वाचणार आहे. यासाठी आमदार हसन मुश्रीफ यांचेही सहकार्य लाभले आहे. या वेळी माजी सभापती अल्बर्ट डिसोझा, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मुकुंदराव देसाई, जिल्हा बॅंक संचालक सुधीर देसाई, तालुका संघाचे संचालक मधुकर यल्गार, सुभाष देसाई, एम. के. पाटील, गडहिंग्लज बाजार समितीचे माजी अध्यक्ष अभय देसाई, सुभाष देसाई, राजू मुरुकटे, अशोक शिंदे, जनार्दन बामणे, संभाजी पाटील, रमेश देसाई, सदाशिव देसाई, सरपंच आकाराम देसाई, उपसरपंच रेश्मा पाटील, निंगुडगेचे सरपंच कृष्णा कुंभार, ठेकेदार प्रकाश देसाई आदी उपस्थित होते.