इचल : वैद्यकीय अधिकारी कधी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इचल : वैद्यकीय अधिकारी कधी
इचल : वैद्यकीय अधिकारी कधी

इचल : वैद्यकीय अधिकारी कधी

sakal_logo
By

‘आयजीएम’ला अपुऱ्या मनुष्यबळाचा ‘ताप’
मंजूर पदे २१८, सेवेत १४५ जण; वैद्यकीय अधिकारी चौघेच

संदीप जगताप : सकाळ वृत्तसेवा

इचलकरंजी, ता. १७ : आयजीएम सुसज्ज होण्याच्या वाटेवर असून रुग्णालयात अत्याधुनिक उपकरणे दाखल होत आहेत. मात्र रुग्णालयाच्या क्षमतेनुसार अ वर्ग कर्मचाऱ्यांची १८ पदे मंजूर असताना केवळ ४ वैद्यकीय अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. त्यांच्यावर कामाचा अतिरिक्त ताण पडत आहे. जिल्हा शल्यचिकित्सक व डीडी कार्यालयाने तत्काळ ठोस मार्ग काढण्याची गरज आहे.
जिल्हयात सीपीआरनंतरचे मोठे शासकीय रुग्णालय म्हणून आयजीएम रुग्णालयाची ओळख आहे. रुग्णालयात एअर सर्क्युलेशनच्या माध्यमातून पूर्णत: निर्जंतुकीकरण करणारे ऑपरेशन थिएटर, २४ बेडचा अत्याधुनिक अतिदक्षता विभाग, ७५ बेडचे ट्रामा केअर सेंटरचे काम सुरू आहे. उपचारासाठी आवश्यक अत्याधुनिक उपकरणे दाखल होत आहेत. येथे हातकणंगले, शिरोळ तालुक्यासह कर्नाटक सीमाभागातून रोज ६०० हून अधिक बाह्यरुग्ण तर १०० ते १२५ अंतररुग्ण दाखल होत आहेत. एकीकडे रुग्णांची संख्या वाढत असताना कर्मचारीवर्ग अपुराच आहे.
२०० बेडची मंजुरी असून ३०० बेडचा प्रस्तावही पाठवला आहे. सध्या २१८ पदे मंजूर आहेत. प्रत्यक्षात १४५ कर्मचारी सेवेत आहेत. रुग्णालयात बालरोगतज्ज्ञ, अस्थिव्यंग, क्षयरोग, नाक-कान-घसातज्ज्ञ हे केवळ चार ‘अ’ वर्ग अधिकारी कार्यरत आहेत. रिक्त पदे तत्काळ भरून नागरिकांना दिलासा देणे गरजेचे बनले आहे.
--------
चौकट
दृष्टिक्षेप
गट* मंजूर पदे* भरलेली पदे* रिक्त पदे
अ वर्ग-१*१८*४*१४
अ वर्ग-२* २८*२७*१
ब वर्ग* २*२*०
शुश्रूषा क वर्ग*९३*७९*१४
तांत्रिक क वर्ग *२९*१४*१५
कार्यालयीन क वर्ग *१०*९*१
चार वर्ग * ३८*१०*२८
एकूण * २१८*१४५*७३
------
कोट
अपुरा कर्मचारीवर्ग जिल्ह्यातील अनेक रुग्णालयांत आहे. त्यासाठी कंत्राटी पदे भरून मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. डॉक्टरांकडून कंत्राटी बेसवर काम करण्यास प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे समस्या निर्माण होत आहे. लवकरच मार्ग काढण्यात येईल.
- डॉ. अशोक हुबेकर, जिल्हा शल्यचिकित्सक