
महावीर कॉलेज व्याख्यान
83544
कोल्हापूर : प्रिन्सिपल एस. व्ही. आपटे व्याख्यानमालेत बोलताना डॉ. बी. एम. हिर्डेकर.
बदलणाऱ्या समाजाशी निगडित कायदा
गतिशील होतो ः डॉ. बी. एम. हिर्डेकर
कोल्हापूर ः बदलणाऱ्या समाजाशी निगडित कायदा गतिशील होतो, असे डॉ. बी. एम. हिर्डेकर यांनी सांगितले. शहाजी विधी महाविद्यालयात प्रिन्सिपल एस. व्ही. आपटे व्याख्यानमालेत ‘कायद्याची गतिशीलता आणि बदलती समाजव्यवस्था’ याविषयावर त्यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, ‘समाजाच्या जबाबदाऱ्या कायद्याशी निगडीत असतात. स्वयंसेवी संस्थांनी केलेले निरीक्षण, विविध समित्यांचे अहवाल, केसेस, समाजातील घडामोडी व विविध पातळीवर होणारी चर्चा यावर कायदा बनविण्याची प्रक्रिया घडते. प्रशासकीय यंत्रणा, न्यायव्यवस्था, कायदेमंडळ, समाज यांनी हातात हात घालून काम करावे. प्रत्येक ठिकाणची परिस्थिती, समस्यांवर संसदेत चर्चा होऊन कायद्याची निर्मिती, बदल होतो.’ कौन्सिल ऑफ एज्युकेशनचे सचिव डॉ. विश्वनाथ मगदूम यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. मीनाताई आपटे, विद्यार्थी उपस्थित होते. प्राचार्य डॉ. प्रवीण पाटील यांनी प्रास्ताविक केले. डॉ. अस्मिता पाटील, मंजिरी कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. समन्वयक डॉ. सविता रासम यांनी आभार मानले.