
क्रिप्टो करन्सी फसवणूक बाबत तक्रार
क्रिप्टो करन्सी फसवणुकीबाबत तक्रार
कोल्हापूर, ता. १७ : क्रिप्टो करन्सीच्या माध्यमातून राजारामपुरीतील एकाची सुमारे चार लाख नव्वद हजार रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार राजारामपुरी पोलिस ठाण्यात दिली आहे. यामध्ये दोघांनी मिळून ही फसवणूक केल्याचे म्हटले आहे. मात्र, याबाबत अद्याप गुन्हा दाखल नसल्याचे राजारामपुरी पोलिसांनी सांगितले.
तक्रारीत म्हटले आहे, की क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक करून भरीव मोबदला रक्कम देण्याचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक करणाऱ्या व्यक्तींवर कडक कायदेशीर कारवाई करा, अशी मागणी तक्रारदाराने केली आहे. याचा तक्रार अर्ज पोलिस अधीक्षकांसह राजारामपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षकांना केला आहे. धनादेश आणि फोन पे या ॲपच्या माध्यमातून ही रक्कम दिल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.
संबंधित गुंतवलेली रक्कम परत देण्याबाबत तक्रारदाराने विचारणा केली होती. त्यावेळी त्यांनी ही रक्कम ही स्वतःच्या वैयक्तिक उपभोगाकरिता खर्च केल्याचे सांगितले. त्यांनी विविध लोकांच्याकडून प्रलोभन दाखवून पैसे जमा केले आहेत. त्यांनी त्या रकमेतून अलिशान चारचाकी गाड्या खरेदी केलेल्या आहेत. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या ठिकाणी जंगम व स्थावर मालमत्ता देखील खरेदी केल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.
-------