ठाकरे यांच्यासोबत राहण्याचा निर्धार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ठाकरे यांच्यासोबत राहण्याचा निर्धार
ठाकरे यांच्यासोबत राहण्याचा निर्धार

ठाकरे यांच्यासोबत राहण्याचा निर्धार

sakal_logo
By

83622
गडहिंग्लज : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पदाधिकाऱ्यांनी दसरा चौकात एकत्र येत उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहण्याचा निर्धार केला.

उद्धव ठाकरे यांच्यासोबत
राहण्याचा गडहिंग्लजला निर्धार
गडहिंग्लज, ता. १८ : पक्षाचे चिन्ह, नाव गेले असले तरी उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहण्याचा निर्धार शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी केला. येथील दसरा चौकात एकत्र येत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्‍वास कायम असल्याचे दाखवून दिले.
निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे नाव व धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय दिला. या पार्श्‍वभूमीवर आज दुपारी एकच्या सुमारास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पदाधिकारी, कार्यकर्ते दसरा चौकातील शाखेसमोर जमले. उद्धव ठाकरे तुम आगे बढो..., उद्धव ठाकरे यांचा... आदी घोषणा देण्यात आल्या. तालुकाप्रमुख दिलीप माने, शहरप्रमुख संतोष चिक्कोडे, रियाज शमनजी यांची भाषणे झाली. त्यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली.
वसंत नाईक, काशिनाथ गडकरी, रेखा पाटील, सुनीता पाटील, मंगल जाधव, रवींद्र डोंगरे, अजित खोत, शरद दबडे, मनीष हावळ, संतोष भोपळे, आनंदा माने, संभाजी येडूरकर, दिगंबर पाटील, आप्पासाहेब गायकवाड, आप्पासाहेब सुतार, तुकाराम वाघराळकर, भाऊसाहेब पडवळे, तुकाराम पेडणेकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.