
रेसिडेन्सी क्लब जाहिरात बातमी
83691
रेसिडेन्सी क्लबमध्ये
सिल्क साड्यांचा सेल
कोल्हापूर, ता. १८ ः लग्नसराईसाठी नानाविध व्हरायटी व नव्या कलाकुसरीच्या सिल्क साड्यांचा सेल रेसिडेन्सी क्लबमध्ये सुरू आहे. हा सेल शुक्रवार (ता. १७) पासून सुरू झाला असून बुधवार (ता. २२) पर्यंत सुरू राहील. सेलमध्ये देशाच्या कानाकोपऱ्यातून साड्या व ड्रेस मटेरियल उपलब्ध करून दिले आहेत. सध्या ट्रेंडिगमध्ये असलेले दागिनेही पाहायला मिळतील. साड्यांमध्ये १५ हजारांपासून २ लाखांपर्यंतच्या हस्तकलेतून साकारलेली गुजरातची डबल इक्कत पटोला साडी उपलब्ध आहे. बनारसी सिल्क, पैठणी, खास विवाहासाठी भागलपूर सिल्कच्या कुर्तासाठी कापड व मोदी जॅकेटसाठीचे कापड विक्रीसाठी उपलब्ध आहे. तमिळनाडूची जरी वर्क कांजीवरम साडी, म्हैसूर सिल्क साडी, बिहारचे टस्सर सिल्क, आंध्र प्रदेशमधील उपाडा, ओडिशातील मुंगा सिल्क यांची व्हरायटी रेसिडेन्सी क्लबमध्ये पाहायला मिळेल. यासोबतच सेलचे आकर्षण असलेली कश्मिरी शालही महिलांच्या पसंतीस उतरत आहे.