आरोग्य केंद्रांच्या मंजुरीसाठी चढाओढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आरोग्य केंद्रांच्या मंजुरीसाठी चढाओढ
आरोग्य केंद्रांच्या मंजुरीसाठी चढाओढ

आरोग्य केंद्रांच्या मंजुरीसाठी चढाओढ

sakal_logo
By

जिल्‍हा परिषद ... लोगो
...

आरोग्य केंद्रांच्या मंजुरीसाठी चढाओढ

विभागाचे प्राधान्य ठरणार कसे?

सकाळ वृत्तसेवा

कोल्‍हापूर, ता.१९: जिल्‍हा नियोजन मंडळाकडून आरोग्य विभागाच्या बांधकामासाठी निधी दिला जाणार आहे; मात्र निधीच्या तुलनेत प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांच्या बांधकामांची संख्या मोठी आहे. त्यामुळे नेमके प्राधान्य देणार कोणाला, हे प्राधान्य कशाच्या आधारे ठरणार, हे मात्र गुलदस्‍त्यात आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्‍हाण यांनाच आता या प्रकरणात लक्ष घालावे लागणार आहे.

जिल्‍हा परिषदेच्या आरोग्य विभागाला नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र बांधणे, उपकेंद्र बांधणे, अस्‍तित्‍वातील केंद्रांमध्ये फर्निचर करणे, तसेच दुरुस्‍ती करणे यासाठी निधी दिला जातो. यावर्षीही हा निधी मिळणार आहे; मात्र निधीच्या तुलनेत बांधकामांची संख्या अधिक आहे. वास्‍तविक भागाची गरज, रुग्‍णसंख्या, उपलब्‍ध जागा या सर्वाचा विचार करून यास मंजुरी देणे आवश्यक आहे; मात्र ‘वजना’वर आरोग्य केंद्रांची मंजुरी होत असल्याच्या तक्रारी लोकप्रतिनिधी, कंत्राटदार करत आहेत. या मंजुरीसाठी निरोपही देण्यात येत आहेत. त्यामुळे आरोग्यातील गोंधळ चर्चेत आला आहे.

आरोग्य केंद्रांची ज्या ठिकाणी आवश्यकता आहे, त्यांनाच प्रथम प्राधान्य देणे आवश्यक आहे; मात्र आरोग्य विभागाकडून न्याय मिळेल का, याबाबत माजी सदस्यांना शंका आहे. त्यामुळेच मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यां‍नी यात लक्ष घालावे, अशी मागणी होत आहे.