
सुमंगल लोकोत्सव
83719
...
सुमंगलम लोकोत्सवांतर्गत आज शहरात शोभायात्रा
मुख्यमंत्री शिंदे यांची उपस्थिती ः लोकांनी सहभागी होण्याचे आवाहन
कोल्हापूर, ता. १८ ः कणेरीच्या सिद्धगिरी मठावर सोमवार (ता. २०) पासून सुरू होत असलेल्या पंचमहाभूत सुमंगलम् लोकोत्सवाची सुरूवात उद्या (ता. १९) शिवजयंतीदिनी निघणाऱ्या भव्य शोभायात्रेने होणार आहे. गांधी मैदानातून सुरू होणाऱ्या शोभायात्रेची सांगता पंचगंगा नदीवर महाआरतीने होणार आहे. या शोभायात्रेत नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मठाधिपती काडसिद्धेश्वर महाराज यांनी केले आहे.
शिवाजी पेठेतील महात्मा गांधी मैदानामधून या शोभायात्रेला सुरूवात होणार असून बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, पापाची तिकटी, गंगावेशमार्गे पंचगंगा नदी या ठिकाणी ही यात्रेची सांगता होईल. पंचगंगा नदीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री दीपक केसरकर, उद्योगमंत्री उदय सामंत, राजेश क्षीरसागर यांच्या उपस्थितीत पंचगंगेची महाआरती होऊन या यात्रेची सांगता होईल.
विविध चौदा राज्यांतील पारंपरिक लोकवाद्यांसह कलाकारांचा सहभाग आणि त्यांचे सादरीकरण तसेच छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित चित्र, त्यांचे पर्यावरणविषयक विचार यांचे प्रदर्शन हे या निवडणुकीचे प्रमुख वैशिष्ट्य असणार आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यातील गोजेगाव येथील ११ जणांचे घडशी - गुरव समाजाचे सामुदायिक तुतारी वादन पथक हे मुख्य आकर्षण असणार आहे. नागरिकांनी २० ते २६ फेब्रुवारीदरम्यान कणेरी मठावर होणाऱ्या या पंचमहाभूत सोहळ्याची सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
......