शिवजयंती पत्रके एकत्रितपणे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवजयंती पत्रके एकत्रितपणे
शिवजयंती पत्रके एकत्रितपणे

शिवजयंती पत्रके एकत्रितपणे

sakal_logo
By

शिवरायांचे आठवावे रूप...
शहर परिसरात विविध उपक्रमांनी शिवजयंती उत्साहात

लिड
‘शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप, शिवरायांचा आठवावा साक्षेप भू मंडळी,’ अशा प्रेरणाविचाराने आज शहर परिसरातील विविध संस्था, संघटना, शाळा, महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी झाली. या वेळी शिवरायांच्या कार्याचा जागर विविध उपक्रमांतून घालण्यात आला.
...


कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या केंद्र कार्यालयात ज्येष्ठ संचालिका डॉ. निवेदिता माने यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. संचालिका श्रुतिका काटकर, व्यवस्थापक जी. एम. शिंदे, आर. जे. पाटील, उपव्यवस्थापक सुनील वरुटे, शिवाजी आडनाईक, गिरीश पाटील, केंद्र कार्यालय, शहरातील सर्व शाखांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
...
कोल्हापूर महापालिका
राजर्षी छत्रपती शाहू सभागृहातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी पुष्पहार अर्पण केला. उपायुक्त शिल्पा दरेकर, सहायक आयुक्त विनायक औंधकर, मुख्य लेखापाल संजय सरनाईक, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, उपशहर अभियंता नारायण भोसले, नगरसचिव सुनील बिद्रे, समीर व्याघ्रांबरे, प्रशांत पंडत, अंजली जाधव, विद्यार्थिनी, कर्मचारी उपस्थित होते. राजमाता जिजामाता गर्ल्स हायस्कूलच्या विद्यार्थिनी, अधिकाऱ्यांनी ‘जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा’ हे राज्यगीत सामूहिकपणे गायन केले. महापालिकेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज चौक, निवृत्ती चौक येथील पुतळ्यांभोवती विद्युत रोषणाई केली.
...
कोल्हापूर आर्यसमाज एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन
संचालित शाहू दयानंद हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, शाहू दयानंद मोफत मराठी शाळा, शाहू दयानंद हायस्कूल तांत्रिक विभाग, आर्यसमाज बालमंदिर, शां. कृ. पंत वालावलकर मागासवर्गीय वसतिगृह शाखांतर्फे शिवजयंती झाली. प्रशालेच्या मुख्याध्यापिका एस. आर. कलिकते, मराठी शाळेच्या मुख्याध्यापिका प्रतिभा पाटील, सौ. मेटिल यांच्या हस्ते शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन झाले. एस. ए. जाधव यांनी प्रास्ताविक केले. विद्यार्थ्यांनी शिवरायांच्या जीवन कार्याविषयी भाषणे केली. श्री. कोळी यांनी आभार मानले.
...
जिल्हा बहुजन माध्यमिक शिक्षक
व सेवक सहकारी पतसंस्था
छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन संचालक रवींद्र मोरे यांच्या हस्ते झाले. संस्थाध्यक्ष रघुनाथ मांडरे, उपाध्यक्ष विकास कांबळे, समिती सदस्य राहुल माणगावकर, ज्येष्ठ संचालक प्रकाश पोवार, संचालक नंदकुमार कांबळे, दिलीप वायदंडे, संजय कांबळे, रघुनाथ कांबळे, योगेश वराळे, बापू कांबळे, दत्तात्रय टिपुगडे, विलास दुर्गाडे, सुजाता भास्कर, सुजाता देसाई, आण्णा पाटील, व्यवस्थापक बाबूराव साळोखे, कर्मचारी उपस्थित होते.
...

जिल्हा खादी ग्रामोद्योग संघ
जिल्हा स्वातंत्र्य सैनिक संघटना, म. दुं. श्रेष्ठी समता हायस्कूलतर्फे छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन संघाचे अध्यक्ष सुंदरराव देसाई यांनी केले. प्राचार्य व्ही. डी. माने, प्रा. डी. डी. चौगुले, प्रा. सुजय देसाई, मुख्याध्यापक श्री. सावंत, सरदार आंबर्डेकर, मुख्याध्यापिका सुमन पाटील, गीता गुरव, छाया भोसले, सविता देसाई, राजेंद्र अंगज उपस्थित होते. प्राचार्य माने यांनी छत्रपती शिवरायांचा शौर्याचा इतिहास सांगितला. प्रा. सदाशिव मनुगडे, प्रा. देसाई यांनी मनोगत व्यक्त केले. प्रा. चौगुले यांनी सुजय देसाई लिखित ‘शिवराय आज्ञापत्र’, ‘शिवरायांची आचारसंहिता’ देऊन शिवरायांचे विचार आचरणात आणावेत, असे सांगितले.
...

आर्य क्षत्रिय समाजाज
मनीष माने यांनी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पूजन केले. उपाध्यक्ष उमेश बुधले, संचालक भानुदास सूर्यवंशी, गणेश चव्हाण, श्रीदेवदत्त आंबले, धनंजय होनकळसे, विजय करजगार, सुनीता सूर्यवंशी, वैशाली भिसे, नागेश गवळी, सुरेश सूर्यवंशी, बाळासाहेब होनकळसे, सभासद, सेवक उपस्थित होते.
...


प्रबुद्ध भारत हायस्कूल
मुख्याध्यापक संजयकुमार अर्दाळकर अध्यक्षस्थानी होते. प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक पांडुरंग रामाणे यांची प्रमुख उपस्थित होते. श्री. अर्दाळकर, श्री. रामाणे यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन केले. आठवीच्या विद्यार्थिनींनी पाळणा नृत्य सादर केले. १० वीचा विद्यार्थी अथर्व कोगे याने ‘अफझल खानाचा वध’ एकपात्री नाटिका सादर केली. शर्वरी धुमाळ, ऋतुराज खंदारे यांनी ‘छत्रपती शिवराय’ पोवाडा सादर केले. वसंत अर्दाळकर आणि आठवी, नववीच्या विद्यार्थिनींनी ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ हे राज्य गीत गायले. राजू सूर्यवंशी यांनी आयोजन केले. उषा कोल्हे यांनी सूत्रसंचालन केले. अध्यापक राजू सूर्यवंशी यांनी आभार मानले.
...
कळंबा गर्ल्स हायस्कूल
आर. आर. चौगले यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. मुख्याध्यापिका एस. ए. जाधव यांनी प्रास्ताविक केले. राज्यगीत सादर करून कार्यक्रमाची सुरवात झाली. विद्यार्थिनींनी मनोगतातून शिवरायांच्या कार्याची महती सांगितली. संस्था पदाधिकारी, सौ. जाधव उपस्थित होत्या.
...
बालसंकुल
कोल्हापूर ः बालसंकुलात छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेस प्रा. डॉ. जे. के. पवार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण केला. उपाध्यक्ष सुरेश शिपूरकर यांनी मनोगत व्यक्त केले. संस्थेचे सहमानद कार्यवाह एस. एन. पाटील, अधीक्षक पी. के. डवरी, सचिन माने, द्रौपदी पाटील, नजिरा नदाफ, मीना कालकुंद्रे, कर्मचारी तसेच प्रवेशित मुले-मुली उपस्थित होती. मानद कार्यवाह पद्मजा तिवले यांनी आभार मानले.
...
नानासाहेब गद्रे हायस्कूल
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवरायांच्या प्रतिमा पूजनाने झाली. मुख्याध्यापक शिरोळकर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. आठवीच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र गीत, पोवाडा सादर केला. होनगेकर यांनी मनोगत व्यक्त केले. बेलवलेकर यांनी सूत्रसंचालन केले. चोरमारे यांनी आभार मानले.
...
सौ. सुनीतादेवी सोनावणे हायस्कूल
प्राची यमगर्णिकर, प्राची यादव, सृष्टी भोसलेने मनोगत व्यक्त केले. प्रांजली मोरे, सई सरडे, किर्ती कुंभार हिने छत्रपती शिवरायांचा पोवाडा सादर केला. मुख्याध्यापक धनाजी बेलेकर, महेश पाटील, सौ. मनीषा शिरगावे, दत्तात्रय कोळेकर, विद्यार्थी उपस्थित होते. सागर आळवेकर यांनी सूत्रसंचालन केले.
...
मिलिंद हायस्कूल
छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. मुख्याध्पयाक एम. एम. शिर्के अध्यक्षस्थानी होते. महाराष्ट्र राज्याते राज्यगीताचे गायन केले. पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवरायांच्या कार्याचा आढावा घेतला. एस. बी. पडवळ यांनी शिवरायांच्या सामाजिक कार्याबद्दल माहिती दिली. शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते. एन. पी. कुरणे यांनी आभार मानले.
...
जयभारत शिक्षण संस्था
संचालित जय भारत हायस्कूल, डॉ. श्रीधर सावंत विद्यामंदिरातर्फे संस्था उपाध्यक्षा सुमित्रा जाधव यांच्या हस्ते प्रतिमा पूजन झाले. इतिहास सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन केले. पहिले ते दहावी तीन गटात वेगवेगळ्या विषयानुसार स्पर्धा घेतली. विविध शाळांतील २९० स्पर्धकांनी सहभाग घेतला. श्रेयसी पाटीलने अफजल खानाचा प्रसंग पोवाड्यातून सादर केला. एम. वाय. निकाडे यांनी शिवरायांच्या पराक्रमाचा आढावा घेतला. मुख्याध्यापिका अश्‍विनी पाटील यांनी प्रास्ताविक केले. वैभव कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. एस. एम. काळे यांनी आभार मानले. अरुण कुंभार यांनी संयोजन केले.
...
कोल्हापूर बौद्ध अवशेष
कोल्हापूर : कोल्हापूर बौद्ध अवशेषमार्फत शिवाजी चौक येथील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला जिल्हा बौद्ध अवशेषचे मुख्य संरक्षक माजी खासदार प्रा. जोगेंद्र कवाडे, अध्यक्ष टी. एस. कांबळे, कार्याध्यक्ष बापूसाहेब कांबळे, भगवान कांबळे, लता नागावकर आदींनी अभिवादन केले. सर्व शिवप्रेमींना जयंती आनंदाने साजरी करावी, असे आवाहन केले.
...
भारत ज्येष्ठ नागरिक संघ
वसंतराव थोरात यांनी प्रतिमा पूजन केले. अजित शिंदे यांनी पुष्पहार अर्पण केला. युवराज राजवाडे, दिनकर कांडगावकर, विमल पोखर्णीकर, सर्जेराव मालेकर, वसंतराव खांडेकर आदींनी छत्रपती शिवरायांबद्दल माहिती सांगितली. रंजनी बेलारीकर, दादासो कांबळे, श्रीमती ठाणेकर, भरत संकपाळ, डी. एस. घोलराखे आदी उपस्थित होते. बाळासाहेब सावर्डेकर यांनी प्रास्ताविक केले. प्रमोद हुपरीकर यांनी आभार मानले.
...
जिल्हा काँग्रेस कमिटी
कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीत जिल्हा अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले. दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होण्यासाठी सायकलवरून गेलेल्या जिल्ह्यातील आमरोळी (ता. चंदगड) येथील नितीन नांगणूरकर यांनी देगलूर नांदेड ते जम्मू काश्मीरपर्यंत आणि परत कोल्हापूर असा दौरा केला. यासाठी त्यांचा आमदार पाटील यांच्या हस्ते सत्कार केला. ॲड. गुलाबराव घोरपडे, शहर अध्यक्ष सचिन चव्हाण, जिल्हा सचिव संजय पोवार-वाईकर, ब्लॉक अध्यक्ष किशोर खानविलकर, महमद शरीफ शेख, युवक काँग्रेसचे अध्यक्ष उदय पोवार, अनवर शेख, संध्या घोटणे, वैशाली महाडिक, हेमलता माने, शुभांगी साखरे, लीला धुमाळ, सेवादल जिल्हा अध्यक्ष रंगराव देवणे, अंजली जाधव, एन. एन. पाटील, तानाजी लांडगे, आंनद करपे, नारायण लोहार, शिलेदार, अमेय निकम, सुशांत विभुते, मुजफ्फर टिनवाले, विजयानंद पोळ, अर्जुन सकटे, सर्फराज रिकीबदार, यशवंत थोरवत, बाबूराव कांबळे, युवराज पाटील, निवास कांबळे उपस्थित होते.
--
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ
‘गोकुळ’च्या ताराबाई पार्क येथील कार्यालयात संचालक बाबासाहेब चौगले यांच्या हस्ते व संचालक अजित नरके, प्रकाश पाटील, संघाचे अधिकारी यांच्‍या उपस्थितीत छञपती शिवाजी महाराज यांच्‍या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. डेअरी व्‍यवस्‍थापक अनिल चौधरी, बोर्ड सेक्रेटरी प्रदीप पाटील, संघाचे अधिकारी प्रकाश आडनाईक, ए. एस. स्वामी, प्रकाश दळवी, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील उपस्थित होते.