Fri, March 31, 2023

इचलकरंजीत संधिवात तपासणी शिबीर
इचलकरंजीत संधिवात तपासणी शिबीर
Published on : 19 February 2023, 3:57 am
इचलकरंजीत संधिवात तपासणी शिबीर
इचलकरंजी,ता. १९ : सेवा भारती संचलित डॉ. हेडगेवार रुग्णालय, आयुर्वेद व पंचकर्म चिकित्सा विभागातर्फे संधिवात पीडित गरजू रुग्णांसाठी संधिवात शिबिराचे आयोजन केले आहे. शिबीर मंगळवारी (ता.२१) दुपारी तीन वाजेपर्यंत सेवा भारती, सोना-पार्वती सदन, टिळक पथ, गुजरी कॉर्नर येथे घेण्यात येणार आहे. शिबिरात आयुर्वेद व पंचकर्माच्या आधारे मोफत तपासणी, उपचार व तज्ज्ञ वैद्यांचे मार्गदर्शन मिळणार आहे.
शिबिरामध्ये गुडघेदुखी, पाठ, मान, कंबर दुखी, मणक्याचे विकार, सांधेदुखी आदी तक्रारीसंबंधी मार्गदर्शन व उपचार तज्ज्ञ डॉक्टर करणार आहेत. शिबिराची नोंदणी सुरू असून या आयुर्वेद व पंचकर्म उपचार शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासकीय अधिकारी डॉ. राजेश पवार व आयुर्वेद विभागाचे वैद्य ज्ञानेश्वर भगत यांनी केले.