
ज्येष्ठ नागरिक हेल्पलाईन आढावा
33578
विशेष
अमोल सावंत
ज्येष्ठांचा आधार,
‘एल्डर लाईन’
लिड
वृद्धाश्रम, आरोग्य सुविधा, अनुदान, घरातील छळ आदींबाबतची अचूक माहिती ज्येष्ठांना असावी लागते. जेणेकरून ज्येष्ठांना आधार मिळेल. यासाठी समाजकल्याण विभाग, केंद्र शासनातर्फे ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी १४५६७ ही हेल्पलाईन (एल्डर लाईन) अनेक समस्यांसाठी उपयुक्त ठरली. महाराष्ट्रात ही हेल्पलाईन पुण्यातील जनसेवा फाउंडेशन चालविते. ज्येष्ठांच्या मदतीकरीता प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक प्रतिनिधी नेमला आहे. या हेल्पलाईनवर जिल्हाधिकारी कार्यालयाचे नियंत्रण आहे. ज्येष्ठांच्या दररोजच्या समस्यांकरीता माहिती, मार्गदर्शन मिळवण्यासाठी देशात एकच व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा ‘एल्डर लाईन’चा उद्देश आहे.
------------------
चार्ट
जिल्ह्यातील चित्र
सहा लाख ज्येष्ठ नागरिक
प्रत्येक तालुक्यात सरासरी ५० हजार ज्येष्ठ नागरिक
एका आमदारामागे ५० हजार ज्येष्ठांची संख्या
-----------------
मदतीसाठी
१०८ ॲम्ब्युलन्स हेल्पलाईन
११२, १०० हेल्पलाईनसुद्धा कार्यरत
१४५६७ ‘एल्डर लाईन’ हेल्पलाईन (सागर कोगले, क्षेत्रिय अधिकारी)
-----------------
कोट
जिल्ह्यात २५० ज्येष्ठ नागरिक संघ कार्यरत असून तालुका समन्वय समिती, जिल्हा समन्वय समिती कार्यरत आहे. सर्व संघांमार्फत ज्येष्ठांच्या समस्येवर तोडगा काढला जातो. मार्गदर्शन केले जाते. या हेल्पलाईनचा फायदा अनेकांना झाला आहे.
- प्राचार्य डॉ. मानसिंगराव जगताप, सदस्य, ऑल इंडिया ज्येष्ठ नागरिक संघटना.
-------------
ज्येष्ठांच्या समस्या
- आर्थिक, कायदेशीर, शारीरिक आव्हानांना सामोरे
- आरोग्यासाठी तत्काळ मदत मिळत नाही
- अनेकदा सोईस्करपणे ज्येष्ठांकडे दुर्लक्ष
- शारीरिक, मानसिक छळ
- घरात वेगळे टाकले जाते
- अनेकदा घरातून बाहेर काढले जाते
-----------------
हेल्पलाईनमुळे काय होते?
एल्डर लाईनमुळे आरोग्य, निदान, उपचार निवारा, वृद्धाश्रम, डे-केअर सेंटर, पोषण, ज्येष्ठांसाठीची उत्पादने, सांस्कृतिक, आध्यात्मिक, कला, करमणूक आदींबाबतची माहिती दिली जाते. कायदेविषयकमध्ये वैयक्तिक/कौटुंबिक स्तरावर, वादविवाद निराकरण, आर्थिक, पेन्शनसंबंधित सरकारी योजनांसाठी मार्गदर्शन केले जाते.