‘सन्मानधन’च्या अटी शिथीलची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘सन्मानधन’च्या अटी शिथीलची मागणी
‘सन्मानधन’च्या अटी शिथीलची मागणी

‘सन्मानधन’च्या अटी शिथीलची मागणी

sakal_logo
By

ich209.jpg
84108
इचलकरंजी : कोल्हापूर जिल्हा घर कामगार संघटनेच्या वतीने सहाय्यक कामगार आयुक्त जानकी भोईटे यांना निवेदन देण्यात आले.
-----------
‘सन्मानधन’च्या अटी शिथीलची मागणी
इचलकरंजी, ता. २० : महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळांतर्गत राज्यातील नोंदणीकृत घरेलू कामगारांना ‘सन्मानधन योजनेमधील अटीमुळे बहुतांशी घरेलू कामगार या लाभापासून वंचित राहतील. त्यामुळे या योजनेतील आटी शिथिल कराव्यात. या मागणीचे निवेदन कोल्हापूर जिल्हा घर कामगार संघटनेतर्फे सहाय्यक कामगार आयुक्त जानकी भोईटे यांना दिले.
शासनाने महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळा अंतर्गत वयाची ५५ वर्ष पूर्ण केलेल्या नोंदित व मागील सलग दोन वर्ष जिवीत नोंदणी असलेल्या घरेलू कामगारांना ‘सन्मानधन योजने अंतर्गत दहा हजार रुपये बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र आदेशात नमूद केलेल्या अटीमुळे बहुतांशी घरेलू कामगार या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे या अटी रद्द कराव्यात, असे निवेदनात नमूद केले आहे.