बेताल वक्तव्य करणाऱ्या संजय राऊत यांचा जामीन रद्द व्हावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बेताल वक्तव्य करणाऱ्या संजय राऊत यांचा जामीन रद्द व्हावा
बेताल वक्तव्य करणाऱ्या संजय राऊत यांचा जामीन रद्द व्हावा

बेताल वक्तव्य करणाऱ्या संजय राऊत यांचा जामीन रद्द व्हावा

sakal_logo
By

वातावरण बिघडविणाऱ्या
संजय राऊतांवर कारवाई व्हावी

पालकमंत्री केसरकर; विधिमंडळ कार्यालय उद्धव ठाकरेंच्या मालकीचे नाही

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २० ः ‘निवडणूक आयोग घटनात्मक आहे. या आयोगावर आरोप करणाऱ्या संजय राऊत यांचा जामीन रद्द झाला पाहिजे. ते सातत्याने बेताल वक्तव्य करून राज्यातील वातावरण बिघडवत असून त्यांच्यावर कारवाई व्हावी’, अशी मागणी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे केली.
‘विधिमंडळ कार्यालय हे कुणाच्या मालकीचे नसते, तर सरकार आणि विधिमंडळाच्या मालकीचे असते. ते उद्धव ठाकरे यांच्या मालकीचे देखील नाही. दादागिरी कुठेही चालत नाही. आम्ही कुणावरही मालकी सांगितली नाही, सांगणारही नाही. ज्यांना शिवसेना म्हणून मान्यता मिळाली त्यांचा या कार्यालयावर अधिकार आहे. आम्ही शिवसेनेत आहोत. आमचा धनुष्यबाण घेऊन आम्ही अयोध्येला जाऊन त्याचे पूजन करणार आहोत. आम्ही वाईट बोलणार नाही. आम्ही कायदेशीर कारवाई करू’, असे केसरकर यांनी सांगितले. ‘शरद पवार यांच्याजवळ आहात. ते लहान मुलांशीदेखील आदराने बोलतात. त्यांच्याकडून कसे बोलावे, कसे बोलू नये हे शिका. त्यांच्याकडून तरी काही चांगल्या गोष्टी शिका’, असा सल्ला त्यांनी संजय राऊत यांना दिला.