Wed, March 29, 2023

इचलकरंजीत भाकपतर्फे निदर्शने
इचलकरंजीत भाकपतर्फे निदर्शने
Published on : 21 February 2023, 2:06 am
ich211.jpg
84227
इचलकरंजी : भाकपच्या वतीने प्रांताधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करीत निदर्शने करण्यात आली.
इचलकरंजीत भाकपतर्फे निदर्शने
इचलकरंजी : भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जेष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या खुन्यांना पकडण्यात राज्य सरकार व पोलिस प्रशासनास अपयश आले आहे. गुन्हेगारांना जलद पकडावे या मागणीचे निवेदन भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने प्रांताधिकारी कार्यालयात दिले. घोषणाबाजी करीत निदर्शने केली. शिष्टमंडळात हणमंत लोहार, दादासो जगदाळे, महेश लोहार, विष्णू चव्हाण, मंगल तावरे, मीना भोरे, फातिमा शेख, वर्षा जाधव, गजराबाई कोळी, समिर दानवाडे आदी उपस्थित होते.